साहित्य व संस्कृती

प्रकाश किरण प्रतिष्ठानचे उत्कृष्ट साहित्य ग्रंथ पुरस्कार जाहीर

वीणा रारावीकर, डॉ.रमाकांत कोलते, भारत सातपुते, डॉ.अजय देशपांडे, डॉ.अण्णा वैद्य, डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ योगिता रांधवणे यांना पुरस्कार

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील प्रकाश किरण प्रतिष्ठानचे २०२३ या वर्षाचे उत्कृष्ट साहित्य ग्रंथ पुरस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले यांनी जाहीर केले. प्रकाश किरण प्रतिष्ठान मागील १६ वर्षांपासून साहित्यिकांच्या दर्जेदार पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे. वाचन संस्कृती वाढावी, वाचनाची, लेखनाची गोडी निर्माण व्हावी, नवोदित लेखक कवींना प्रोत्साहन मिळावे, उत्तेजन व प्रेरणा मिळावी यासाठी हे पुरस्कार दिले जातात.

सन २०२३ च्या पुरस्कारासाठी गुजगोष्टी शतशब्दांच्या ( अलकसंग्रह ) वीणा रारावीकर, मुंबई; चांदणे शिंपीत जा (लेखसंग्रह ) – डॉ.रमाकांत कोलते, यवतमाळ; शिकाळं (कथासंग्रह ) – भारत सातपुते, लातूर; हे मानवा… निर्मिक तू… ( कवितासंग्रह ) – डॉ.बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूर; मराठी ग्रामीण आई : स्वरूप आणि शोध ( संशोधन ग्रंथ ) – डॉ.योगिता रांधवणे श्रीरामपूर आणि दृष्टांत वैभव – केशिराज संपादित निवडक ४० दृष्टांत ( संपादन ) – संपादक डॉ.अजय देशपांडे व डॉ.अण्णा वैद्य या साहित्यकृतींची निवड जाहीर झाली आहे.

गौरवचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लोविन भोसले, उपाध्यक्ष किरण भोसले, सचिव प्रकाश भोसले, कोषाध्यक्ष सौ.विजया भोसले, सदस्य सौ.पल्लवी किरण भोसले, सौ.अनुराधा प्रकाश भोसले, आकाश किरण भोसले, कु.अवनी प्रकाश भोसले, कु.स्नेहा किरण भोसले यांनी अभिनंदन केले. सर्व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना लवकरच समारंभपूर्वक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष लेविन भोसले यांनी दिली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button