सामाजिक

विजय दिनानिमित्त रक्तदान शिबीर घेऊन सोनगाव येथे शहीद जवानांना अभिवादन

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान - किरण पाटील अंत्रे

राहुरी : तालुक्यातील सोनगाव येथे स्वरूप सामाजिक फाऊंडेशनच्या वतीने 16 डिसेंबर विजय दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन प्रवरा बँकेचे संचालक संतोष पाटील अंत्रे व सोनगाव सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप यांच्या हस्ते करण्यात आले.

एक पाऊल मदतीचे, प्रयत्न जीव वाचविण्याचे, या संकट समयी मदत करू या, रक्तदान करून प्राण वाचवू या, “या सुशोभितास अनुसरून तसेच भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या वीर जवानांना अभिवादन करण्याच्या निमित्ताने सोनगाव येथील स्वरूप सामाजिक फाउंडेशनच्या संकल्पनेतून तसेच नगर येथील अष्टविनायक रक्तपेढी यांच्या सहकार्याने फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा मा. उपसरपंच किरण पाटील अंत्रे यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. सोनगाव, सात्रळ, धानोरे, निंभेरे पंचक्रोशीतील युवक युवतींनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

स्वरूप सामाजिक फाउंडेशनचे किरण अंत्रे, प्रवरा बँकेचे संचालक संतोष अंत्रे, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप, भाजपचे बिपीन ताठे, अभिजित कुलकर्णी, प्रवीण अंत्रे, महेंद्र अनाप, गणेश अनाप, संदीप अनाप, सुनील अंत्रे, प्रशांत अंत्रे, अमीर तांबोळी, मोहम्मद तांबोळी, किशोर अनाप, संतोष गाडेकर,विनोद पलघडमल, प्रकाश सिनारे, संजय कानडे, गणेश शिंदे,शैलेश कुलधरण, भारती अंत्रे, योगिता ढमक यांच्यासह आदींनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिरासाठी अहमदनगर येथील अष्टविनायक रक्तपेढीचे डॉ. शैलेंद्र पाटणकर, संदीप पाटोळे, संजय मुळे, राहुल देवकर, अतुल पाटोळे, श्रीपत मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले. रक्तदान करण्यासाठी आलेल्या रक्तदात्यांचे तसेच भरघोस सहभागासाठी स्वरूप सामाजिक फाउंडेशन तर्फे किरण अंत्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button