शिरसगाव उपसरपंचपदी यादव यांची बिनविरोध निवड
ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सोमवारी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव ग्रामपंचायत येथे उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी फक्त एकच अर्ज संजय बबन यादव यांचा या पदासाठी अर्ज दाखल झाला. निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार हेमलता वाकडे यांनी काम पाहिले व त्यांना ग्रामसेवक पी डी दर्शने व कामगार तलाठी बी एल कदम यांनी सहकार्य केले.
उपसरपंचपदी निवड झाल्यावर संजय यादव व सरपंच राणी वाघमारे यांचा विजयाचे शिल्पकार गणेशराव मुदगुले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाशअण्णा चित्ते, पांडे, माजी सरपंच व भाजपचे बाबासाहेब चिडे, सौ.मंगल ताके, नितीन गवारे, दत्ता जाधव, कचरू बढे, अध्यक्ष अशोकराव पवार, प्रवीण यादव आदींनी सत्कार करून मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी निवडणूक महिलांनी हातात घेतली. संत हरीबाबा जनविकास मंडळावर मतदारांनी विश्वास टाकल्याबद्दल व विजयाबद्दल प्रकाश चित्ते यांनी अभिनंदन केले. गावाच्या विकासासाठी योग्य निर्णय दिला. ज्याप्रमाणे भास्करराव पेरे आणि पोपटराव पवार यांना आदर्श गाव करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केले, त्याप्रमाणे शिरसगाव सुद्धा सुंदर आदर्श गाव व्हायला वेळ लागणार नाही.
गावचे नेतृत्व गणेशराव मुदगुले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सत्ता आल्यावर फार जबाबदारी असते त्याची जाणीव ठेवून चुकीची कामे करायला लावू नये. रस्त्यावर अतिक्रमणे झाली आहेत व मी त्यास समर्थन देणार नाही. उपसरपंच पदासाठी माझ्याकडे कोणीही आले नाही. विश्वासाने विकास कामे हाती घेतली जाणार आहेत. ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार येत्या सोमवारी दि. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता शिरसगाव येथे महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे. गावचा सर्वांगीण विकास होणे हे आद्य कर्तव्य आहे. रस्ते, लाईट, स्वच्छता आदी कामे महत्वाची आहेत. लवकरच स्वच्छ पाणी देण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहेत.
यावेळी सचिन गवारे, महेश ताके, कडू, जोशी, हिरामण माळी, बापूसाहेब काळे, सचिन गवारे, सुरेशराव ताके, ललित गायकवाड, कडू पवार, रमेश यादव, बाबा शेख, इक्बाल कुरेशी, महेश ताके आदींसह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने तसेच पोलीस विभागाचे हेड कॉ संतोष परदेशी, पो.ना.एम शेलार उपस्थित होते.