अहमदनगर

२६ नोव्हेंबर रोजी साकरवाडी येथे पेन्शनर्स मेळावा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : इपीएस ९५ पेन्शन धारकांचे पेन्शनवाढ आदी प्रलंबित प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी देशभर आंदोलने करण्यात आली. अद्याप केंद्र सरकार, कामगार मंत्री, अर्थमंत्री, इपीएफओ कार्यालय निर्णय घेत नसल्याने व त्यासाठी दि. १२ डिसेंबर रोजी इपीएस ९५ पेन्शन धारकांचे देशव्यापी आंदोलन नवी दिल्ली जंतरमंतर येथे आयोजित करण्यात आले आहे. त्याची तयारी व आतापर्यंत पेन्शन वाढीसंबंधी केलेल्या कायदेशीर प्रयत्नांचे आदी माहिती देण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता चेतना मंगल कार्यालय साकरवाडी ता.कोपरगाव येथे पेन्शन धारकांचा मेळावा महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना श्रीरामपूर वतीने आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात निवृत्त कर्मचारी, राष्ट्रीय समन्वय समिती, राष्ट्रीय संघटन नागपूर अध्यक्ष प्रकाश येंडे, म.राज्य पेन्शनर संघटना श्रीरामपूर अध्यक्ष एस एल दहिफळे, सरचिटणीस सुभाष कुलकणी तसेच बाबुराव दळवी नगर, बाबासाहेब गाढे कोपरगाव, अंकुश पवार राहुरी, भागीनाथ काळे नेवासा, शिवाजीराव कोकाटे‌ कोपरगाव, रामदास सोनवणे साकरवाडी आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

सन २०१२ मध्ये खा भगतसिंह कोशियारी समितीने पेन्शन वाढीचा अहवाल सादर केला. तो केंद्र सरकारने स्वीकारला नाही. तो स्वीकारला असता तर आज सर्वांना ९ हजार रुपये अधिक महागाई भत्ता अशी पेन्शन मिळाली असती. २० एप्रिल २०२३ व २९ ऑगस्ट २०२३ लोकसभा सेक्रेटरीयेट दिल्ली अडीशनल डायरेक्टर यांनी पेन्शन धारकांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत किमान ३ हजार रुपये पेन्शन अधिक महागाई भत्ता द्यावा अशी शिफारस केली. अद्याप निर्णय न झाल्याने अनेक आंदोलने केली, आदी माहिती देण्यात येणार आहे. तरी या मेळाव्यास जिल्ह्यातील पेन्शन धारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आर डी सोनावणे, बाबूलाल पठाण, गोरक्षनाथ आहेर, भाऊसाहेब कोल्हे, हिम्मत भुजंग आदींनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button