अहमदनगर

लोणी खुर्द ग्रामपंचायत कडुन कर्मचाऱ्यांना ११ लाख रुपयांचा बोनस व कपडे वाटप

सरपंच जनार्दन घोगरे यांची माहिती

लोणी : राहाता तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठ्या असलेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायतीने आपल्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचे वेतन सानुग्रह अनुदान व एक महिन्याचे वेतनापोटी दिवाळी निमित्त १० लाख २५ हजार रुपये व प्रत्येकी दोन गणवेश पोटी जवळपास पंच्याहत्तर हजार रुपये अशी एकूण ११ लाख रुपये वाटप करून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केल्याची माहिती लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे यांनी दिली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना सालाबाद प्रमाणे बोनस जाहीर करणारी लोणी खुर्द ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

लोणी खुर्द ग्रामपंचायतचे कर्मचारी गावासाठी काम करत असुन गावातील नागरी सुख सुविधा पुरविण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. आरोग्य, पाणी पुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छता, रोगप्रतिबंधक फवारणी, तणनाशक फवारणी आवश्यक कामात ग्रामपंचायत चे ३० कर्मचारी स्वतःला झोकुन रात्रंदिवस काम करत आहे. अशा आपल्या ग्रामपंचायत च्या कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त न्याय मिळावा या हेतुने साठ दिवसांचा बोनस चालु महिन्याचे वेतन यापोटी १० लाख २५ हजार रुपये तर गणवेश पोटी ७५ हजार रुपये असे एकुन जवळपास ११ लाख रुपये वाटप करुन त्याची दिवाळी गोड करणार असल्याची माहिती सरपंच जनार्दन घोगरे यांनी दिली.

दोन महिन्याचा पगार सानुग्रह व एक महिन्याचा पगार दिवाळी निमित्त वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करणारी लोणी खुर्द ग्रांमपंचायत जिल्ह्यातील पहिलीच ग्रांमपंचायत ठरली असुन कामगारामधुन समाधान व्यक्त होत आहे.

या बैठकीसाठी उपसरपंच आर्चना आहेर, सुनिता कोरडे, ललिता आहेर, रुपाली घोगरे, विलास घोगरे, किरण आहेर, रोहिदास बोरसे, प्रदीप ब्राम्हणे, मायकल ब्राम्हणे, अलका राऊत, मंगल बारसे, ग्रामविकास अधिकारी गणेश दुधाळे उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button