राजकीय

शिरसगाव ग्रामपंचायत निवडणूकीत तीन गटात चुरस; सरपंच पदासाठी ३ तर १७ जागेसाठी ५० उमेदवार रिंगणात

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : शिरसगाव ग्रामपंचायत निवडणूकीत तीन गटात चुरस पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत सरपंच पदासाठी ३ तर १७ सदस्य जागेसाठी ५० उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

यात अर्ज माघारीच्या दिवसानंतर शिरसगाव ग्रामपंचायत सरपंच पदासाठी एससी/ स्त्री राखीव- जयश्री प्रदीप अभंग, आनंदीबाई पावलस जाधव, राणी संदीप वाघमारे या तीन उमेदवारांमध्ये लढत राहील. तसेच प्रभाग १ सर्वसाधारण- शिवाजी बापू शिंदे, सुनील ज्ञानदेव लेंगरे, सचिन ज्ञानदेव गवारे, मागास प्रवर्गसाठी मंदाकिनी हरिभाऊ तुवर, उज्वला भारत लाड, आशा संजय क्षीरसागर, प्रभाग २ सर्वसाधारण दत्तात्रय बबनराव गवारे, नितीन बाबासाहेब गवारे, सुनील सीताराम भोसले, प्रभाग २ ना.मा.प्रवर्ग स्त्री-इंदुबाई कचरू बढे, राधा संजय गवारे, भारती निवृत्ती कुळधरण, सर्वसाधारण स्त्री-प्रयागा जगन्नाथ जाधव, आरती संतोष यादव, लताबाई दगडू यादव, प्रभाग ३ अनु जाती- संगीता साईनाथ आल्हाट, संदीप संजय साठे, बंडू कडू सुतार, सर्व साधारण- अण्णासाहेब शामराव जाधव, नितीन सोपानराव गवारे, संजय बबनराव यादव, सर्व साधारण स्त्री- स्वाती जगदीश गवारे, हिराबाई अशोक गवारे, प्रभाग ४ अ.जाती- नितीन साहेबराव गायकवाड, अशोक पेत्रस जाधव, प्रकाश आनंद दुशिंग, सर्व साधारण- राजाराम गजानन गवारे, भास्कर जगन्नाथ ताके, महेश शंकर ताके, शुभम अण्णासाहेब ताके, सर्व साधारण स्त्री- पुष्पा अशोक गवारे, सविता निलेश गवारे, सुनिता भागवत बकाल, प्रभाग ५ ना.मा.प्र- मनोज अण्णासाहेब गवारे, सुरेश अप्पासाहेब मुदगुले, सुभाष नारायण यादव, अनु जाती स्त्री-वनिता विजय गायकवाड, ज्योती गौतम जाधव, अरुणा संजय त्रिभुवन, सर्वसाधारण स्त्री-भारती मधुकर गवारे, जायदा युनुस पठाण, रुबिना महम्मद पठाण, प्रभाग ६ सर्व साधारण- हर्षल प्रकाश दांगट, गणेश चंद्रकान बोरुडे, रणजीत रंगनाथ सिनारे, अनु.जाती स्त्री-शीतल धनंजय भालेराव, संगीता संजय रुद्राक्षे, मायादेवी सुरेश सातुरे, अनु ज.स्त्री- जनाबाई गोरक्षनाथ बर्डे, हिरा सारंगधर मोरे असे उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असून मतदारांचा कौल कोणास जातो हे येत्या ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान दिनी समजणार आहे.

निवडणुकीची रणधुमाळी ३ गटात सरळ लढत असून त्यासाठी गणेशराव मुदगुले, ना.विखे. पा.गट, किशोर पाटील यांचा आदिक, कानडे गट व आबासाहेब गवारे, लोकनेते भानुदास मुरकुटे यांचा गट असे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे. तिहेरी लढत व मतांची विभागणी यातून कोण बाजी मारतो याकडे शिरसगाव मतदारांचे लक्ष लागून आहे. आज अर्ज माघारी घेतल्यानंतर सर्वांना निवडणुकीचे चिन्ह देण्यात आले आहेत. सरपंच पदासाठी ३ व १७ जागेसाठी ५० उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button