कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती प्रकल्पाचे प्रमाणीकरण

राहुरी विद्यापीठ : सेंद्रिय शेतीला चालना मिळावी तसेच शेतकर्यांना सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना 2018-19 मध्ये विद्यापीठ प्रक्षेत्रावर 18 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. सेंद्रिय शेती सुरू करून पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या सेंद्रिय शेती प्रकल्पामध्ये बहुविध पिके, मिश्रफळ शेती, विविध पूरक उद्योग, बायोगॅस व सेंद्रिय निविष्ठा निर्मिती आदींचे प्रयोग या प्रकल्पात राबविण्यात येत आहेत. नुकतेच सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र येथील विविध पिके तसेच फळपिके यांचे सेंद्रिय प्रमाणीकरण राजस्थान राज्य जैविक प्रमाणीकरण संस्था, जयपूर, राजस्थान यांच्याद्वारे करण्यात आले.

राजस्थान राज्य जैविक प्रमाणीकरण संस्था, जयपूर, राजस्थान येथील निरीक्षक मुकेश मीना यांनी प्रक्षेत्रावरील विविध पिकांची तसेच, देशी गायींचा गोठा, शेळीपालन, कुक्कुटपालन, जैविक निविष्ठा कक्ष, साठवण कक्ष, विक्री केंद्र यांची पाहणी व निरीक्षण केले. तसेच, त्यांनी प्रमाणीकरणाविषयी माहिती दिली व सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून दिले. हा कार्यक्रम पार पाडण्याकरिता महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील तसेच संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या प्रमाणीकरण कार्यक्रमामध्ये कृषि विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, प्रकल्प सह-समन्वयक अधिकारी डॉ. उल्हास सुर्वे, सहयोगी प्राध्यापक डॉ. नितीन दानवले व प्रकल्पाचे सर्व वरिष्ठ संशोधन सहाय्यक, प्रक्षेत्र सहाय्यक उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button