धार्मिक

उंदीरगाव ते नेपाल, गंगासागर, जगन्नाथपुरी सहलीस माजी आ. मुरकुटे यांच्या शुभेच्छा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : २००९ या वर्षापासून या परिसरातील तसेच तालुक्यातील गरीब, शेतकरी, मजूर यांना आतापर्यंत ना नफा ना तोटा या धर्तीवर ३० ते ३५ सहली भारतभर कन्याकुमारी ते वैष्णवदेवी, जगन्नाथपुरी ते रामेश्वर अशा पद्धतीने काढल्या आहेत, असे या सहलींचे सूत्रधार माजी चेअरमन सुरेश पा.गलांडे यांनी सांगितले.

या सहलीचे अल्पदरात १४ हजार रुपयांत नियोजन केले आहे. त्यात जेवण, नाश्ता सुविधा आहेत. या सर्व यात्रेकरूंना उंदीरगाव येथील ग्रामस्थांसह अशोकचे संचालक विरेश गलांडे, बाळासाहेब नाईक, सुदाम औताडे, सुरेश शिंदे, मार्केट कमिटी संचालक राजेंद्र पाउलबुद्धे, दिलीपराव नाईक, भगवान ताके, अशोक गलांडे, हरिभाऊ पटारे, तुकाराम सलालकर, राजेंद्र गिर्हे, गोरख भालदंड आदींनी शुभेच्छा दिल्या.

त्याचप्रमाणे अशोकनगर उद्योग समूह येथे सर्व ३ बसेस आल्यावर त्यांना अशोक कारखाना चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, माजी चेअरमन सुरेश पा,गलांडे, संचालक राजेंद्र पाउलबुद्धे, सुरेश शिंदे आदी मान्यवर व ग्रामस्थांनी प्रवासासाठी १५० यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. तेथून श्री योगीराज गंगागिरीजी महाराज ट्रॅव्हल्स रवाना झाल्या.

या प्रवासात नेपाल, गंगासागर, जगन्नाथपुरी जाताना अनेक धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या जातील. दि २३ रोजी नर्मदा दर्शन, ओंकारेश्वर मुक्काम, २४ रोजी उज्जैन, खजुराहो, जगप्रसिद्ध लेणी व २६ रोजी मुक्काम, दि २७ चित्रकुट, त्रिवेणी संगम, काशी विश्वेश्वर, व २७ ला कशी मुक्काम, दि २९ अयोध्या व मुक्काम, दि ३० नेपाळव गोरखपूर मुक्काम, दि १ पशुपतीनाथ व काठमांडू मुक्काम, दि ३ पितृगया, भगवान बुद्ध मंदिर, हावडा ब्रिज, गंगासागर स्नान, सूर्यमंदिर व लेणी आदी व दि १० जगन्नाथपुरी मुक्काम, दि १३ गजानन महाराज, शेगाव व मुक्काम, दि १४ रोजी श्रीरामपूर प्रवास सांगता होईल असे संयोजक सुरेश पा. गलांडे यांनी सांगितले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button