शिक्षणवारी ज्ञान पंढरी

प्राथमिक शाळा पेमगिरीत राष्ट्रीय पोषण सप्ताह व आजी आजोबा कृतज्ञता सोहळा संपन्न

संगमनेर | बाळासाहेब भोर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेमगिरीत राष्ट्रीय पोषण सप्ताह व तसेच आजी आजोबा कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रीय पोषण आहार साप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थी, माता व पालकांनी मानवी शरीरासाठी पौष्टीक असे विविध पदार्थ बनवून आणले होते. सर्वच माता पालकांनी या पाककृती स्पर्धेसाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या रुचकर पदार्थांचा कार्यक्रमासाठी सर्व उपस्थितांनी मनसोक्त आस्वाद घेतला.

या कार्यक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांसाठी कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. आजी आजोबा म्हणजे या बालगोपालांसाठी एक प्रकारचं बालपणातील स्वछंदी विद्यापीठच म्हणावं लागेल. भारतीय संस्कृतीचे दर्शन म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आजी आजोबांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी विद्यार्थी व आजी आजोबा यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव जाणवत होते.

या कार्यक्रम प्रसंगी पेमगिरी गावचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थानचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद तसेच पेमगिरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button