क्रीडा

सार्थक बनसोडे यास क्रिडा पुरस्कार प्रदान

राहुरी : तालुक्यातील तांदुळवाडी येथील सार्थक उत्तम बनसोडे यास उत्कृष्ट स्केटिंगपटू पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृह येथे राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त विविध प्रकारच्या खेळांतील उत्कृष्ट खेळाडुंना उद्योजक मास्टर चंदगीराम क्रिडा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, किरण सामंत, शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर, नगराध्यक्ष राहुल पंडीत आदींसह मान्यवरांच्या उपस्थित सार्थक बनसोडे यास उत्कृष्ट स्केटिंगपटू पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सार्थक बनसोडे याने यापूर्वीदेखील स्केटिंग स्पर्धेत यश संपादन केले आहे. सार्थक हा फोटोग्राफर उत्तम बनसोडे यांचा मुलगा असून त्याला ऋषिकेश तारडे यांचे मार्गदर्शन लाभले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button