राजकीय

सुरेश गलांडे यांची बीआरएस तालुकाध्यक्ष पदी निवड

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश पाटील गलांडे यांची भारत राष्ट्र समिती पक्षाच्या श्रीरामपूर तालुका अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल श्रीरामपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील पाऊलबुद्धे, नानासाहेब गलांडे, बाबासाहेब गलांडे, राजू गिऱ्हे, रेवजी भालदंड, बाळासाहेब राऊत व मेहबूबभाई व ग्रामस्थांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

लोकनेते माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे समवेत सर्व कार्यकर्त्यांनी बीआरएस मध्ये प्रवेश केल्याने राज्यात शेतकऱ्यांना मोफत वीज, पाणी पुरवठा आदी सुविधा तेलंगणा प्रमाणे मिळण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी म्हणजे विकासाचे प्रश्न मार्गी लागतील असे मनोगत सुरेश गलांडे यांनी व्यक्त केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button