साहित्य व संस्कृती

श्रम व ज्ञानशीलतेचा संदेश देणारी पुस्तके प्रत्येक घरात असावीत – देशमुख

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या पुस्तकांनी अनेकांना प्रभावीत केले आहे. त्यांच्या पुस्तकांनी श्रम आणि ज्ञानशीलतेचे संस्कार अनेकांना दिले, ग्रामीण समाजात वाचनाची हौस आहे पण पुस्तके, लेखक, कवी यांच्यापर्यंत जाता येत नाही, त्यासाठीच गावोगावी प्रत्येक घरी पुस्तके असली पाहिजेत, त्यातून मोबाईलकडून लोक पुस्तकाकडे वळतील असे मत कडा येथील महाराष्ट्र राज्य वाहन, चालक संघटना संघर्ष ग्रुपचे सहसचिव सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या पुस्तकावर परिसंवाद आणि मान्यवरांना पुस्तके भेट देऊन सत्कार करताना सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी मोहनराव देशपांडे, सौ. वंदनाताई देशपांडे, मंदार देशपांडे, बाळूकाका देशपांडे यांचा पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.त्याबद्दल डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी आनंद व्यक्त करीत अशी पुस्तके देणे हीं संस्कृती वाढावी आणि संघर्ष ग्रुप हॆ कार्य करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

सुभाष देशमुख यांनी पुस्तके आणि कुटुंब संस्कृती यांचे नाते घट्ट व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. उपस्थितांनी डॉ.उपाध्ये यांची पुस्तके आवडल्याबद्दल मते व्यक्त केली. सौ.वंदनाताई देशपांडे यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button