कृषीदुतांकडून शून्य ऊर्जा शितकक्ष प्रात्यक्षिक
नेवासा : तालुक्यातील वडाळा बाहिरोबा येथे कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत वडाळा बाहिरोबा येथे आलेल्या कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांनी ग्रामीण कृषी शून्य ऊर्जा शितकक्ष या विषयावर उत्कृष्ठरित्या प्रात्यक्षिक सादर केले. विटा, वाळू, बांबू, गवत, पोती अशा सहज मिळणाऱ्या साधनांचा वापर करून कृषीदूतांनी शेतकऱ्यांना शितकक्ष कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिक सादर केले. शेतकऱ्यांचा अनावश्यक खर्च कमी व्हावा म्हणून फळे व भाजीपाला साठवण यासंबंधी जागरूकता व्हावी व त्यांच्या खर्चात बचत व्हावी यासाठी कृषीदूतांकडून हा उपक्रम राबविण्यात आला. या प्रात्यक्षिक दरम्यान भानसहिवरे कृषी महाविद्यालय येथील कृषीदूत प्रविण बोरुडे, शिवसागर दोडके, प्रथमेश जामकर, वैभव चापे, अनिकेत चव्हाण, प्रज्वल काकडे यांनी शीतकक्ष उभारणी व त्याचा वापर यासंदर्भात माहिती दिली. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए तूरभटमट, कार्यक्रम समन्वयक एम. आर. माने, प्रा. महाजन सर, प्राध्यापिका खकाळे मॅडम, प्रा. सागर साबळे, प्रा. सागर सोनटक्के यांचे मार्गदर्शन लाभले