साहित्य व संस्कृती

‘मन की बात’ ला अर्पण केलेले डॉ. उपाध्ये यांचे ‘साहित्य चिंतन’ उद्बोधक – प्रा.दिलीप सोनवणे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : विश्वप्रिय व्यक्तिमत्व असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या जीवनप्रेरक लोकसंवादी कार्यक्रमास अर्पण केलेले डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे ‘साहित्य चिंतन’ हे वैचारिक ललितगद्य पुस्तक सामाजिक संस्कृतीशील मूल्य सांगणारे उद्बोधक पुस्तक असल्याचे मत संगमनेर येथील साहित्यिक प्रा. दिलीप सोनवणे यांनी व्यक्त केले.

येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान वाचनालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 100 व्या ‘मन की बात’ भागाचे स्वागतपर जाणिवेने आयोजित डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित ‘साहित्य चिंतन’ ह्या वैचारिक ललितगद्य पुस्तकावर परिसंवाद प्रसंगी प्रा. दिलीप सोनवणे बोलत होते. यावेळी सागर जोर्वेकर, संकेत सोनवणे, सौ. मंदाकिनी उपाध्ये, सौ. आरती उपाध्ये, गणेशानंद उपाध्ये, निर्मिक उपाध्ये उपस्थित होते.

प्रारंभी सरस्वती प्रतिमा नमन झाले, कर्मवीर प्रतिमापूजन करण्यात आले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत करून सांगितले की, आज रविवार दि.30 एप्रिल 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ सारख्या देशभक्ती, समाज शक्ती, संस्कृतीनीती, आधुनिक प्रगती, सेवाभाव भक्ती अशी पंचसूत्री असलेल्या ‘मन की बात’ मनावर ठसली, त्या संस्कारातून, प्रेरणेतून ‘साहित्य चिंतन’ आकाराला आले, त्यामुळे हॆ पुस्तक मोदीसाहेबाना अर्पण केले आहे.

या पुस्तकाची दखल साहित्यिक पुंडलिक गवंडी यांनी देखील घेतली. अनेकांनी पुस्तकाचे कौतुक केले, असे सांगून डॉ. उपाध्ये यांनी पाहुण्यांचा सत्कार केले. प्रा. सोनवणे यांनी वाचनालयाचे कौतुक करून ‘साहित्य चिंतन’ हे निर्मळ मनाचे आणि प्रबोधक जीवनाचे पुस्तक असल्याचे सांगितले. गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button