अहमदनगर

सर्व सामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे तहसीलदार – वधवाणी

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तहसीलदार प्रशांत पाटील यांचा बदली आदेश म्हणजे आमच्यासाठी थोडी खुशी थोडा गम असा आहे. गेल्या चार वर्षांपासून त्यांनी श्रीरामपूरकरांना अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, खुप प्रेम आणि स्नेह दिला असे तहसिलदार सोडून जात आहेत याचे दुःख तर नक्कीच आहे. पण त्याहुनही जास्त आनंद याचा आहे की आमचे हे आदर्श कुटुंब प्रमुख तहसिलदार दुसऱ्या तालुक्यात जावुन तिथंही आपल्या चांगल्या कामाचा ठसा उमटवुन तिथेही लोकांच्या मनात घर करतील यात आजीबात शंका नाही. याचाच आनंद जास्त होत आहे.

श्रीरामपूर तालुक्याला तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी मिळणे हे खरोखरच श्रीरामपूर तालुक्यातील लोकांचे भाग्य आहे. सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून काम केले. त्यांच्याकडे काम घेऊन येणारा प्रत्येक व्यक्ती कधीही रिकाम्या हाताने परत गेला नाही. त्याच्या पदरात काही ना काही तरी टाकलेच. आपल्या कार्यालयातून बाहेर पडणारा प्रत्येक व्यक्ती हा हसत खेळत आणि नेहमीच आनंदाने बाहेर पडला आहे. कामात काही कायदेशीर अडचण असेल तर त्यातुन काहीतरी मार्ग काढुन आपण त्याचे काम करुन दिले आणि म्हणूनच आपण सर्वसामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे, असे मनोगत प्रा. राजन वधवाणी यांनी व्यक्त केले.

अगदी शाळेतील विद्यार्थ्यांपासुन तर वयस्कर व्यक्तीच्या मनात त्यांनी घर केले आहे. कित्येक वर्षांपासून प्रलंबित असणारा नाऊर आणि जाफराबाद या दोन गावांच्या सीमेवरील शिव रस्ता दोन्ही गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सामंजस्याने सहजरीत्या हा शिव रस्ता मोकळा करून दिला. आपण एवढ्यावरच न थांबता आपण दोन्ही गावातील सर्व तरुणांना आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन श्रमदानातून चांगला मोठा रस्ता बनवुन दिला. हे पण कार्य महत्वाचे आणि मिखाईल थोरात नावाचे वयस्कर शेतकरी त्याच्या चार एकर जमीनीवर गेल्या चाळीस वर्षापासून अतिक्रमण केलेले होते. त्याने आपल्याकडे कैफियत मांडली आपण सर्व वस्तुस्थिती समजावून घेतली आणि आपण युद्धपातळीवर प्रयत्न करुन त्याची जमीन मोकळी करून त्याच्या ताब्यात दिली.

गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आपण काही दिवसांत सोडविला. यावेळी तो शेतकरी आपल्याला भेटला तेव्हा त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातुन ओसंडून वाहणारा आनंद होता. एके दिवशी आपण कार्यालयात येताना कार्यालय आवारात बसलेल्या एका आजीवर आपले लक्ष गेले. त्यावेळी आपण त्या आजीची आस्थेने विचारपूस करून तीच्या डोलाचा प्रश्न आपण जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना बोलवुन सोडविला. कौटुबिक वादापायी सोनाक्षी नावाच्या अंध मुलीचे नाव रेशनकार्डात टाकता येत नव्हते.

सोनाक्षीच्या डोळ्याचे मोफत ऑपरेशन केवळ रेशनकार्ड मध्ये नाव नाही म्हणून होत नव्हते. आपण ताबडतोब त्या मुलीच्या वडिलांच्या नावाने त्या मुलीच्या नावासह नवीन रेशनकार्ड तयार करून दिले. आणि तीच्या डोळ्यांवरील मोफत ऑपरेशन चा मार्ग मोकळा करुन दिला. जेव्हा तीच्या डोळ्याचे ऑपरेशन फत्ते झाल्यावर ती आपल्याला ऑफीसमध्ये गुलाबपुष्प घेऊन भेटायला आली तेव्हांचा प्रसंग हा अतिशय रोमांचकारी आणि गहीवरुन टाकणारा होता. आपल्या एका छोट्याशा प्रयत्नांमुळे आणि कर्तव्य दक्षेतमुळे सोनाक्षीला दृष्टी प्राप्त झाली. यातुन उपस्थित सर्व बँक अधिकाऱ्यांना समाजाच्या प्रती आपली कर्तव्य भावना काय आहे हा एक चांगला आदर्श आणि चांगला संदेश दिला. यावरून आपण किती संवेदनशील आहात हे सहजरित्या जाणवते.

माणुसकी जपणारा माणुस म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली आहे. आपण नुसते जनतेमध्येच हिरो नाही तर आपण आपल्या स्टाफमध्ये देखील हिरो झालात. अगदी स्वीपर पासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना आपण सन्मानाने, प्रेमाने आणि नम्रतेने वागविले. आजपर्यंत आपल्या सहकाऱ्यांना कुणी एव्हढा जीव लावला नसेल तेव्हढा जीव आपण आपल्या सहकाऱ्यांना लावला आणि म्हणूनच तेव्हढ्याच विश्वासाने आपल्या सहकाऱ्यांनी देखील काम केले आणि म्हणूनच आपल्याला काम करतांना कोणतीही अडचण आली नाही. कोरोना काळात केलेले काम तर अतिशय उल्लेखनीय आणि प्रशंसनीय असे होते.

आपण स्वतः कोरोना पाॅझेटिव्ह असतांनाही न डगमगता न घाबरता आपले कर्तव्य बजावत होता. सर्व जग घरात बसलेले असतांना आपण आपल्या सहकाऱ्यां मार्फत प्रत्यक्ष फिल्ड वर काम केले. प्रत्यक्षात कोरंटाईन सेंटरवर जाऊन पेशंटला बरोबर सुविधा मिळतात कि नाही याची खात्री करून घेत होता. बेड, रेमडेसीवर इंजेक्शन आणि औषधे उपलब्ध करून देणे. त्याचप्रमाणे कोरोना काळात कुणीही उपाशी झोपणार नाही याची विशेष काळजी घेत होता.

रेशन दुकानामार्फत मोफत धान्य वाटपाचे तर आपण अतिशय सुंदर असे नियोजन केले होते. त्यामुळे तालुक्यातील कोणताही व्यक्ती धान्यापासून वंचित राहिला नाही. आपल्या धान्य वाटप नियोजनाची संपूर्ण नगर जिल्ह्यात चर्चा झाली. त्यामुळेच आमच्या रेशन दुकानदारांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. आपल्यामुळे रेशन दुकानदारांना सन्मानाने वागविले जाते. संपूर्ण महाराष्ट्रात आपण आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. म्हणूनच आपल्याला कोरोना योध्दा आणि अहमदनगर जिल्हा महसूल विभागाचा आदर्श व सर्वोत्कृष्ट तहसिलदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोकांमध्ये कोरोना प्रती जागृता निर्माण व्हावी यासाठी आपण वेगळे वेगळे लेख लिहुन लोकांमध्ये जागृता निर्माण केली. यातुन हे सिद्ध होते की आपण एक उत्कृष्ट साहित्यिक, लेखक आणि कवी आहात. सोशल मिडियावरील सध्यस्थितीवर लिहिलेले आपले लेख खरोखरच वाचनीय असे असतात. देशातील जनता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर तिरंगा हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करीत असतांना आपण मात्र आपल्या कुटुंबासोबत आदिवासी लोकांच्या पालात जाऊन आदिवासी कुटुंबासमवेत मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला होता. त्यांच्या झोपडीवर तिरंगा स्वत:च्या हाताने लावुन त्या आदिवासी कुटुंबांनाही देशाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात सहभागी करून घेतले. त्यावेळी त्या आदिवासी कुटुंबांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. त्यांनाही आपलेपणाची भावना निर्माण झाली. जणु काही आपल्या कुटुंबातीलच सदस्य आहे अशी भावना निर्माण झाली. परक्या लोकांना आपलेसा करण्याचा हा आदर्श आपल्या कडुन खरोखरच घेण्यासारखा आहे.

आपण आपले कर्तव्य पार पाडत असतांना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. राजकारणापासून तर आपण फार दुर अंतर ठेवून राहिलात. कोणत्याही राजकीय नेत्यांना कधीही झुकते माप दिले नाही. सर्व पक्षांतील लोकांना एकसारखीच वागणुक दिली म्हणूनच सर्वच राजकीय पक्षात आपले मित्र आहेत. खरोखरच सर आपल्या कामाच्या पद्धतीला तोड नाही, अशा भावना व्यक्त केल्या व पुढील वाटचालीस राजन वधवाणी यांनी शुभेच्छा दिल्या.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button