शिक्षणवारी ज्ञान पंढरी

डॉ. भोर टोरंटो फेलोशिपसाठी रवाना

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : सुप्रसिद्ध यूनिव्हर्सिटी टोरंटोची फेलोशिप डॉ.श्रेयस भोर यांना प्राप्त झाली आहे. त्यासाठी ते नुकतेच कॅनडाकडे रवाना झाले. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या फेलोशीपसाठी जगभरातून २४ लोकांची निवड केली जाते. त्यात डॉ. श्रेयस यांची निवड झालेली आहे.

डॉ. श्रेयस यांचे प्राथमिक शिक्षण श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सोमय्या प्राथमिक विद्या मंदिरमधून झाले असून माध्यमिक शिक्षण पाथर्डी येथील जैन हायस्कूल मधून झाले आहे. कॉलेज मधून उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर नाशिक मधून त्यांनी एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली. मुंबई, परेल येथील टाटा हॉस्पिटल मधून एम.डी.ॲनेस्थेशिया ही पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्याबरोबरच त्यांनी डी.एनबी. ही पदवीही प्राप्त केली आहे.

सुपर स्पेशल पातळीवरील एफ. एन. बी. चे शिक्षण त्यांनी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधून पूर्ण केले आहे. तसेच, युरोपियन डिप्लोमा ही प्राप्त केला आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये कार्यरत असताना दोन वेळा कोरोना पॉझिटिव्ह होऊनही त्यांनी कोरोना रुग्णांच्या सेवेत आपले योगदान दिले आहे. डॉ. श्रेयस हे प्रोफेसर उज्ज्वला भोर व प्राचार्य डॉ. एल.डी. भोर यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.सुप्रिया ह्या एम.डी.पॅथाॅलाॅजिस्ट असून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

प्रतिष्ठेची अशी ही फेलोशिप मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व श्रीरामपूर शैक्षणिक संकुलाच्या चेअरमन मीनाताई जगधने, रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन भगीरथ शिंदे, लोकनेते रामशेठ ठाकूर आदींनी डॉ. श्रेयस यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button