अहमदनगर

निकम व देसाई यांच्या सत्कार्याचा सत्कार प्रेरणादायी – पटारे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. चिंतामुक्त जीवन जगणे ही मनाची खरी श्रीमंती आहे. जेष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम आणि कवी, पत्रकार राजेंद्र देसाई यांचा सत्कार हा त्यांच्या सत्कार्याचा असून तो समाजात प्रेरणादायी असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथील माऊली वृद्धाश्रमात लक्ष्मणराव निकम यांना दिल्ली येथील अखिल भारतीय परीट धोबी समाजातर्फे राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. कवी, पत्रकार राजेंद्र देसाई यांना नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील संस्थेचा आदर्श पत्रकार पुरस्कार घोषित झाल्याबद्दल माऊली वृद्धाश्रमात विविध संस्थेतर्फे सत्कार करण्यात आले. त्यावेळी बापूसाहेब पटारे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते. माऊली वृद्धाश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष वाघुंडे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पाहुण्यांचा परिचय करून देऊन पुरस्कार्थीच्या पुरस्काराची माहिती दिली.

यावेळी माऊली वृद्धाश्रमातर्फे सुभाष वाघुंडे, सौ. कल्पनाताई वाघुंडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य टी. ई. शेळके, प्रमुख पाहुणे बापूसाहेब पटारे, वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा. शिवाजीराव बारगळ, प्रा. रामचंद्र राऊत, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे सुखदेव सुकळे, के.एस. काळे, प्रकाश किरण प्रतिष्ठानतर्फे लेविन भोसले, भूमी फाऊंडेशनतर्फे भीमराज बागुल, बाबासाहेब चेडे आदिंनी दोघांचा बुके, पुस्तके, श्रीफळ, शाल देऊन सत्कार करण्यात आला. वरील मान्यवरासह प्रभाकर भोंगळे, डॉ. भाऊसाहेब कवाडे यांनी सत्कार्थींच्या कार्य व पुरस्काराबद्दल मनोगत व्यक्त केले.

राजेंद्र देसाई, लक्ष्मणराव निकम यांनी आपणास विविध संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले. त्यामुळे पुढील सद्कार्याला प्रेरणा मिळाली, असे सांगून आनंद व्यक्त केला. बापूसाहेब पटारे यांनी जेष्ठ नागरिक, जाणकार यांचा आनंद वाढण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतात. त्यामुळे जेष्ठांना जीवनाचा आनंद घेता येतो असे मत व्यक्त केले. अध्यक्ष भाषणातून प्राचार्य शेळके यांनी आपल्या गावातील विविध प्रसंग सांगून गावात जे चांगले होते, त्याची चर्चा होते व छान उपक्रम होतात. माऊली वृद्धाश्रमात समाजोपयोगी कार्यक्रम होतात.

श्रीरामपूर जिल्हा होण्याकरिता ज्या गोष्टी हव्या असतात. त्यापैकी वृद्धाश्रम हा घटक देखील महत्वाचा आहे. जिल्हा होण्यासाठी श्रीरामपूर सर्वदृष्टीने उपयुक्त आहे. कारण श्रीरामपूर बहुआयामी शहर आहे. आधुनिकता आणि उपक्रमशीलता ही या शहराची वैशिष्ठे आहेत, असे सांगून जेष्ठ नागरिक आनंद मेळावा, माऊली वृद्धाश्रम, वाचन संस्कृती प्रतिष्ठान आदींचे कार्य सांगितले. प्रभावी सूत्रसंचालन केल्याबद्दल प्रभाकर भोंगळे यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे कौतुक करून सत्कार केला. शुभम नामेकर यांनी नियोजनात भाग घेतला. सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button