अहमदनगर

इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपच्या हाताळणीत शास्त्रज्ञांनी कौशल्य मिळवावे – डॉ. तानाजी नरुटे

इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपची तांत्रिक पद्धतीने हाताळणी यावर तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन
राहुरी विद्यापीठ : सध्या सततच्या बदलत्या हवामानामुळे पिकांवर वेगवेगळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. बराच वेळा रोगनिदान न झाल्याने पिकांवर योग्य औषधांची फवारणी होत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान होते.  प्रत्येक कृषी शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप हाताळणीत कौशल्य प्राप्त केले तर प्रत्येक पिकातील विषाणूजन्य रोगांचा  सखोल अभ्यास करून त्यावर संशोधन करणे सोपे होईल व शेतकऱ्यांना योग्य सल्ला मिळेल. त्यामुळे प्रत्येक शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप हाताळणीत कौशल्य प्राप्त करावे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. तानाजी नरुटे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विद्यापीठात तीन दिवसांचे इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपची तांत्रिक पद्धतीने हाताळणी या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रशिक्षणाचे उदघाटन करतांना विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. तानाजी नरुटे बोलत होते. याप्रसंगी व्यसपीठावर विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, संचालक संशोधन डॉ. सुनील गोरंटीवार, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेचे माजी मुख्य तांत्रिक सल्लागार डॉ. जस्वीर सिंग आणि तांत्रिक सल्लागार सौ बलजीत कौर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना डॉ. उत्तम चव्हाण म्हणाले राज्यातील कृषि विद्यापीठांपैकी फक्त या कृषि विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपची सुविधा उपलब्ध आहे. याचा जास्तीत जास्त शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी उपयोग करून घ्यावा. डॉ. सुनील गोरंटीवार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले या इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपचा व्यापारी तत्त्वावर उपयोग व्हावा जेणेकरून याचा फायदा बाहेरच्याही खाजगी कंपन्यांना होईल व आपले विद्यापीठाचे उत्पन्न वाढेल.
या तीन दिवसीय प्रशिक्षणात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची हाताळणी, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप कसे वापरायचे, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप वापरताना कोणती काळजी घेणे गरजेचे आहे इत्यादी विषयांवर सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात कृषि विद्यापीठातील एकूण २७ शास्त्रज्ञ व १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अण्णासाहेब नवले यांनी तर आभार डॉ. संजय कोळसे यांनी मानले. या प्रशिक्षणाच्या आयोजनामध्ये डॉ. नारायण मुसमाडे, डॉ. धनश्री सरनोबत, बापू तरटे, सौ. शीतल जगदाळे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button