अहमदनगर
शिवजयंतीनिमित्त हरेगाव फाटा येथे रक्तदान शिबीर
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : विश्व उद्योग समूह शिरसगाव व मातृभूमी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, 10 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर हरेगाव फाटा, अंजली लॉन्स, विश्व हॉटेल शेजारी येथे आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान करू या… प्रेमाची नाती जोडू या… हा उद्देश समोर ठेवून शिबीर असल्याने यात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.