अहमदनगर

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत थकबाकीदारांना मतदानाचा अधिकार देऊ नये

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : सहकारी संस्थेच्या नियमाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील थकबाकीदारांना मतदानाचा अधिकार देऊ नये अशी मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे संदीप आसने यांनी ई-मेलद्वारे केली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेला विकास कामे करण्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते मात्र अनेक नागरिक आपल्याकडील थकबाकी वर्षानुवर्षे भरत नसल्याने प्रशासनाला विकास कामे करताना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो त्यामुळे सहकारी संस्थेत असलेल्या नियमाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील थकबाकीदारांना मतदानाचा अधिकार देऊ नये जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात कर वसुली होऊन विकास कामांना निधी उपलब्ध होईल तसेच राज्याच्या तिजोरीवर भार पडणार नाही असे यावेळी संदीप आसने यांनी म्हटले आहे.

Related Articles

Back to top button