राजकीय
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ॲड. काळे यांच्या नेतृत्वात श्रीरामपूर बाजार समिती निवडणूक लढविणार – जगताप
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – अशोक सह. साखर कारखान्या प्रमाणेच शेतकरी संघटनेच्या बॅनरखाली श्रीरामपूर कृषी उत्पन बाजार समितीची निवडणूक लढविणार असलेचे श्रीरामपूर ता शेतकरी संघटनेने एकमुखी निर्णय घेतला आहे. तालुक्याच्या सहकारातील गेल्या विस वर्षांपासून प्रस्थापित असलेल्या शक्तीच्या विरोधात पूर्ण ताकतीने पॅनल उभा करणार असलेचे संकेत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांनी दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, डॉ आदिक, इंद्रभान चोरमल, सुदामतात्या औताडे, प्रभाकर कांबळे, सि. वाय पवार, ज्ञानेश्वर आदिक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीरामपूर तालुक्यात गेली विस वर्षांपासून तडजोडीचे राजकारण होत असलेने जिल्हा बँक, अशोक कारखाना, बाजार समिती सह अन्य प्रमुख सहकारी संस्थांमध्ये शेतकऱ्यांना लुटण्याचे धोरण सत्तेत असलेल्या शक्तीने अवलंबिलेले आहे. तालुक्यातील या प्रमुख संस्था गेली अनेक वर्षांपासून विशिष्ठ घराण्याच्याच ताब्यात असलेने शेतकऱ्यावर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे.
नुकत्याच झालेल्या अशोकच्या निवडणुकीत प्रस्तापित असलेल्या मंडळाला तालुक्यासह शेजारील सहकारातील नेत्यांनी शेतकऱ्याच्या विरोधात शेतकऱ्यावर अन्याय करण्यासाठी मदत केली. ज्यांनी मुळा प्रवरा, डॉ. तनपुरे कारखाना, पीपल्स बँक, अशोक मिल्क बंद पडली अश्या नेत्यांच्या युतीच्या ताब्यात श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती द्यायची का? असा सवाल जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी बैठकीत उपस्थित केला. आज मुळा -प्रवाराचे अस्तित्व असते तर शेतकऱ्यांना विजेचा प्रश्न निर्माण झाला नसता. मुळा -प्रवाराचे दीड लाख सभासद असून दहा वर्षात अद्याप मिळणाऱ्या पाचशे कोटी रुपयांचा हिशोब तडजोडीत ताब्यात घेतलेल्या नेत्यांनी दिला नाही. त्यामुळे तालुक्यातील सहकार वाचविण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ॲड. अजित काळे यांच्या नेतृत्वात शेतकरी मतदारांना बरोबर घेऊन निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार केला असलेचे ता. अध्यक्ष युवराज जगताप यांनी यावेळी सांगितले.