अहमदनगर

पेन्शनवाढ मिळेपर्यंत लढा सुरु राहणार- पोखरकर; अहमदनगर येथे ईपीएस पेन्शनर्सची सभा संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : इपीएस-95 ( EPS-95 ) राष्ट्रीय संघर्ष समिती अहमदनगर जिल्हा संघटनेचे वतीने मार्कंडेय संकुल, (नेप्ती नाका ) सभागृहात सभा मोठ्या उत्साहात गुरुवार दि. १० नोव्हे. रोजी संपन्न झाली. या सभेचे आयोजन नगर शहर पेन्शनर्स संघटनेने केले होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष संजय मुनोत हे होते. मेळाव्याची सुरुवात संजय मुणोत यांनी प्रास्ताविक करीत केली. पेन्शन रस्ता कुतुहुल मिश्रीत जीवन मरणाशी संबंधित दोन प्रमुख घटनांचा उल्लेख करीत प्रामुख्याने दि ४ नोव्हेंबर २०२२ रोजी मा सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court) दिलेल्या निकालाकडे लक्ष वेधले. त्यासाठी आज यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविसिंग अण्णा जाधव, धुळे, साक्री तालुकाध्यक्ष अनिल भामरे, पुणे जिल्हा समन्वयक अजितकुमार घाडगे यांचा अहमदनगर जिल्हाध्यक्ष संपतराव समींदर, पश्चिम भारत क्षेत्र संघटक सुभाषराव पोखरकर यांनी उपस्थितांचे वतीने स्वागत व सत्कार केला.
सदर सभेसाठी अहमदनगर शहर व दक्षिण अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी नेवासा तालुकाध्यक्ष बापूराव बहिरट, पाथर्डी तालुकाध्यक्ष हौसराज राजळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष वाळके अप्पा, दौंड तालुकाध्यक्ष शिवाजी दिवेकर, नगर तालुका उपाध्यक्ष भिमराव भिसे, शहर उपाध्यक्ष प्रकाश गायके, जामखेड डॉ.राउत, श्रीगोंदा शहराध्यक्ष डॉ.गाडेकर, लांडे घोडेगाव, लोळगे नेवासा, एस.के.सय्यद, शिवाजी बंगाळ, पोपटराव चोथे आणि दौंड तालुक्यातील मच्छिंद्र दिवेकर, सुहास लकारे, शिवाजी पवार यांचाही सन्मान करण्यात आला. सभेचे सुत्रसंचलन सुभाषराव पोखरकर यांनी केले.
अनिल भामरे यांनी सांगितले की, तालुकास्तरावर संघटन वाढीसाठी प्रयत्न करतांना आलेल्या विविध अडचणींना सामोरे जात संघटन उभे केले, त्यात आमचे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या गावात जेथे पेन्शनर्सची संख्या ३० ते ५० पुढे आहे, तेथे गावपातळीवरच संघटन उभे करणेसाठी राष्ट्रीय संघर्ष समिती घ्या धर्तीवर  “ग्राम संघर्ष समिती” ची निर्मिती करण्याची संकल्पना मांडली आणि संपूर्ण भारतात प्रथमच समिती साक्री तालुक्यात शेवाळी गावात अरुण दादा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम संघर्ष समिती स्थापन केली. त्याला खुपच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानुसार तालुक्यात आतापर्यंत ७ मोठ्या गावात समित्यांची निर्मिती झाली. त्यांच्या माध्यमातूनच आता ग्राम प्रधान ते पंतप्रधान संपर्क अभियान राबविले जात असून पंचायत राज अभियान माध्यमातून गावाचे सरपंच यांच्या माध्यमातून मा पंतप्रधान यांना पेन्शनर प्रश्न सोडविण्यासाठी शिफारस पत्र पाठविली जात आहे, असे असले तरी या अभियानांतर्गत पुणे जिल्हा समन्वयक अजित कुमार घाडगे यांनी सातारा जिल्ह्यातील वडूथ या गावापासून केली. याचा मला अभिमान आहे व आज या मेळाव्यात घाडगे यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा योग अण्णासाहेब पोखरकर यांच्या द्रष्टेपणामुळे व अहमदनगर शहरातील पदाधिकारी यांच्यामुळे मिळाला. संयोजकांचे आभार मानुन त्यांनी मनोगत पुर्ण केले.
पुणे जिल्हा समन्वयक अजितकुमार घाडगे यांनी ग्रामप्रधान ते पंतप्रधान ही संकल्पना सविस्तर मांडून उपस्थितांना आपले भागात हे अभियान राबविण्याचे आवाहन केले. यानंतर पश्चिम भारत क्षेत्र संघटक सुभाषराव पोखरकर यांनी कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनातील विविध टप्प्यातील घटनांचा उल्लेख करीत, १ ते ८ ऑगष्ट २०२२ च्या आंदोलनाचा आढावा घेत ना. श्रममंत्री यांच्या दिल्लीतील २ भेटी, बुलढाणा येथील कमांडर अशोक राऊत व नॅक टीमने केलेल्या प्रयत्नांबाबत सांगत असतांनाच श्रममंत्री महोदयांच्या बुलढाणा व औरंगाबाद दौरा भेटीचा वृत्तांत कथन केला. तसेच अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमन यांच्या पुणे व बारामती, इंदापूर, दौंड, पाटस येथील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भेटीचा वृत्तांत कथन करीत, मा मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्या नेवासा, श्रीरामपूर व संगमनेर येथील भेटीबद्दल संघटनेने केलेल्या प्रयत्नांबाबत अवगत केले.
तद्नंतर सी बी टी बैठकीबाबत संघटनेच्या दिल्ली टीम मुकेश मेहान यांच्या भेटी विषयी तपशीलवार माहिती सांगत  श्रममंत्री हे आपल्या मागण्यांचे संदर्भात संवेदनशील असल्याचे सांगून मा सर्वोच्च न्यायालयाने दि १ सप्टेंबर २०१४ नंतर सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी वास्तविक पगारावर ( Higher Pension ) पेन्शन प्रश्न निकालात काढत, रु १५००० ची मर्यादा संपुष्टात आणली. मात्र १९९५ ते २०१४ पुर्वी सेवानिवृत्त कर्मचा-यांना उच्च पेन्शन साठी लाभ नाकारला आहे. यासाठी मा.कमांडर साहेबांच्या नेतृत्वाखाली मिनिमम पेन्शन रु.७५०० व महागाई भत्ता व इतर मागण्यांसाठी आपले आंदोलन मागणी पूर्ण होईपर्यंत चालू राहणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावा. आपले प्रयत्नांना शंभर टक्के यश मिळेल अशी खात्री बाळगण्याचे आवाहन केले.
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविसिंग अण्णा जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार संस्था व सदस्य पातळीवर आवश्यक कार्यवाही व कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी दिला असला तरी आपणास आर्थिक नियोजन व व्यवहार्यता तपासणे गरजेचे आहे. तसेच संस्था/आस्थापना यांनी ११/४ चा विकल्प व जाॅईंट ऑप्शन याबाबत जागृती व खबरदारी घ्यावी. यासंबंधी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे दिशानिर्देश महत्त्वाचे असतील. २०१४ पूर्वीचे सेवा निवृत्तांना वगळले असले तरी त्यांचेसाठी राष्ट्रीय संघर्ष समिती प्रयत्न करत असून प्रश्न सुटेपर्यंत बुलढाणा येथील साखळी उपोषण आंदोलन सुरू राहणार आहे. संघटन मजबूत करण्यासाठी ग्राम संघर्ष समिती व ग्रामप्रधान ते पंतप्रधान अभियान सक्षमपणे राबविण्यात यावे. त्यामुळे कधीही बाहेर न पडणारे संघटनेत सामील होतील सांगून संयोजकांचे आभार व्यक्त करुन मनोगत पूर्ण केले.
यावेळी श्रीमती शुभांगीताई ठाकूर यांची जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षा म्हणून आणि श्रीमती शिलाताई गिरी व श्रीमती बर्वे यांची अनुक्रमे शहर महिला आघाडी अध्यक्षा व उपाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा निवडीबद्दल सुभाषराव पोखरकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर यांनी उपस्थितांचे आभार मानले. मेळाव्यास मोठ्या संख्येने पेन्शनर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button