गुन्हे वार्ता

डाॅ.आंबेडकर यांची सामाजिक माध्यमातून बदनामी, राहुरीत निषेध

राहुरी | बाळकृष्ण भोसले : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो इडीट करून इंस्टाग्रामवर व्हायरल करून विटंबना करण्यात आली. विटंबना करणाऱ्या आरोपीला त्वरित अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राहुरी येथील जयभीम मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली.
आरपीआय चे तालूकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना निवेदन देण्यात आले. इंस्टाग्राम या सोशल मीडियावर ९११०६९९२३८ या नंबरवरून विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवर अश्लील फोटो जोडून त्यांची घोर विटंबना करण्यात आली आहे. सदरचे कृत्य हे देशात अराजकता माजवणारे व दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे.
सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत असून अशा मानसिक विकलांग प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. जेणेकरून समाजात तेढ निर्माण होऊन अराजकता मारणार नाही. सदर मोबाईल नंबरची चौकशी होऊन त्या इसमावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन त्याला योग्य ते शासन व्हावे. सदर इसमावर आठ दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय.
राहुरी येथील जयभीम मित्र मंडळाच्या वतीने दिलेल्या निवेदनावर आरपीआय चे तालूकाध्यक्ष विलास साळवे, तालूका उपाध्यक्ष सुनील चांदणे, दादू साळवे, स्वप्नील गुप्ता, अजय साळवे, सलमान पठाण, करण साळवे, ऋषभ कसबे, गौरव साळवे, रोहित कसबे, कृष्णा साळवे, हर्षद साळवे, संतोष कौमाड, विकास मकासरे, विकास साळवे, साहिल साळवे, विशाल साळवे, शुभम साळवे, यश साळवे, राहुल शिव आदिंच्या सह्या आहेत.

Related Articles

Back to top button