अहमदनगर

महिलांनी झलकारी बाईंचा आदर्श घ्यावा : सुनीता पवार

राहुरी | बाळकृष्ण भोसले :  राहुरी येथील शनि चौक येथे राणी झलकारीबाई यांची १९२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
याप्रसंगी मूलनिवासी सेवा संघाच्या अध्यक्षा सुनिताताई पवार अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाल्या की, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत प्रति लक्ष्मीबाई अर्थात झलकारी बाई यांनी ब्रिटिशांसोबत निकराची झुंज देत ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. अशा महानायिकेचा इतिहास समाजास प्रेरणा देणारा असून महिलांनी या इतिहासाचा आदर्श घेत सुसंस्कृत संपन्न निर्भीड व देश प्रेमी समाज व राष्ट्र घडवण्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे. 
याप्रसंगी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय संसारे म्हणाले की येणाऱ्या काळात बहुजन समाजातील महिलांनी संघटित होऊन सामाजिक आंदोलनामध्ये सहभागी व्हायला हवे. बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी मूलनिवासी सेवा संघाने महिलांसाठी एक मंच निर्माण करून दिला असून यामध्ये जास्तीत जास्त संख्ये ने सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.  
याप्रसंगी  साक्षी पवार, वैशाली गायकवाड, अर्चना जगधने, सुनिता लालासाहेब पवार, सोनाली पवार आदी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा शिरसाट यांनी केले तर उपस्थितांचे आभार साक्षी पवार यांनी मानले.

Related Articles

Back to top button