अहमदनगर

स्वातंत्र्यदिनी उदमले ग्रामस्तर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

आरडगांव प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी केंदळ बुद्रुक येथील शिक्षक राजू लक्ष्मण उदमले यांना ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्तर आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन स्वातंत्र्यदिनी सन्मानित करण्यात आले.

राजु उदमले यांनी यापूर्वी आरडगाव येथे सामाजिक, साहीत्यिक, व शैक्षणिक क्षेत्रातील कामाबद्दल तसेच जिल्हास्तरीय नाटिका प्रकाशाची पाऊलवाट प्रथम क्रमांक, धाडशी हिरकणी तृतीय क्रमांक, ऊसतोडणी कामगारांच्या शालाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी केलेले अतोनात प्रयत्न, हागणदारी मुक्त गाव योजनेत उत्कृष्ट सहभागाबद्दल ग्रामस्तर आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

आता पुन्हा एकदा स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून केंदळ बुद्रुक ग्रामस्थांनी कोव्हीड-१९ बाबत जनजागृती, उत्कृष्ट लोकसहभागातून भौतिक सुविधा विकास,‌‌ तालुकास्तरीय तिरंगा नाटिकेचा तृतीय क्रमांक, शाळा बंद शिक्षण चालू उपक्रमात विद्यार्थी गृहभेटी, ऑनलाईन शिक्षण, इंग्रजी माध्यमातील १७-१८ मुलांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश या सर्व कार्याचा विचार करून ग्रामस्तर आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. या प्रसंगी तलाठी राहुल क-हाड, पोलीस पाटील प्रल्हाद तारडे, सरपंच गोविंद जाधव, उपसरपंच नामदेव तारडे, ग्रामपंचायत सदस्य विजय चव्हाण, लक्ष्मण भुसे, प्रमोद तारडे, अविनाश हरिश्चंदे, सोसायटी चेअरमन सदाशिव तारडे, बाळासाहेब चव्हाण, ग्रामसेविका श्रीमती भिसे, नंदकुमार तारडे, मुख्याध्यापक शेळके, साळवे, शिंदे व केंदळ ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button