अहमदनगर
मुळा धरणात बुडून युवकाचा मृत्यू तर एका तरुणास वाचवण्यात यश
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : १५ ऑगस्ट रोजी मुळाधरण परिसरात बरेच हौशी पर्यटक आले होते, त्यामध्ये राहुरी येथील हॉटेल वैशालीचे ४ कर्मचारी फिरण्यासाठी आले होते. त्यातील दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरलेे असताना एक जण बुडाला, तर दुसऱ्या तरुणाला गावातील भोई समाजाचे नेते शक्तीलाल गंगे यांचे बंधू विकास गंगे आणि इंद्रजीत गंगे या दोन्ही तरुणांनी धाडस दाखवून वीरेंद्र सिंघराथम या तरुणाला वाचवले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बोकील साहेब, मोरया ग्रुपचे अध्यक्ष गोरख अडसुरे, कॉन्स्टेबल चव्हाण, जाधव, मोराळे आदी घटनास्थळी दाखल झाले.
सलीमभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मृत तरुणाला गावातील मच्छीमार करणारे आदिवासी व भोई समाजाच्या तरुणांनी पाण्याबाहेर काढण्यासाठी शोधकार्य सुरू केले, तसेच आदिवासी नेते दिलीप बर्डे यांनीही सहकार्य केले. यामध्ये विकास गंगे, अशोक गायकवााड, शक्तीलाल गंगे, चंदू बर्डे, लहू बर्डे, किशोर बर्डे, करण सूर्यवंशी, बाळू मामा, हर्जित माळी, सुनील माळी, सोनवणे, संगम परदेशी, रमेश गंगे, सुनील पवार, सुरेश बर्डे, शिवा मामा, दीपक नवसारे, मल्हारी, अरुण पवार, राहूल परदेशी, आदेश गंगे, आकाश गंगे, किशोर पवार, साहिल शेख, नागेश पवार इत्यादि तरुणांनी प्रयत्न केले. विकास गंगे आणि इंद्रजीत गंगे या दोन्ही तरुणांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल, गावातील तरुणांचे पोलीस प्रशासनाने व ग्रामस्थांनी कौतुक केले.