निधन वार्ता

कोल्हारचे आदर्श व्यक्तीमत्त्व हरपल-शिवाजीराजे पालवे

पाथर्डी : तालुक्यातील कोल्हार येथील सरपंच शोभाताई पालवे यांचे पती शिवाजीराव पालवे यांचे हदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. ते पन्नास वर्षाचे होते. कोल्हारचे आदर्श व्यक्तीमत्त्व हरपल्याची खंत जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे शिवाजीराजे पालवे यांनी व्यक्त केली आहे.
त्यांच्या निधनाने कोल्हार, उदरमल, सोकेवाडी, शिराळ चिचोंडी, डमाळवाडी, गितेवाडी, डोंगरवाडी, धारवाडी सह अनेक गावावर शोककळा पसरली. शिवाजी पालवे हे वृक्षमित्र, समाजसेवेसाठी धडपडणारे, नेहमी जनसेवेत असायचे. शेतीतुन आपला परिवार चालवत असताना जिद्द व प्रमणिकपणा, स्मितहस्य, तत्परता असणारा तरूण तडपदार नेतृत्व गोरगरिबांना प्रमाणिकपणे न्याय देणारा, जनतेच्या कल्याणासाठी दिवस रात्र धडपड करणारा, कोल्हुबाई माता गडाच्या तसेच महादेव मंदीर विकासासाठी कटिबद्ध असणारे, परिसरातील सर्व गावातील लोक आदराने सरपंच नावाने हाक मारत कधीही मोठेपणा न दाखवता गावातील प्रत्येकाच्या काळजात असणारे शिवाजी पालवे नवरात्रीच्या निमित्ताने कोल्हार वरून मित्रमंडळी सहीत पायी यात्रा मढी कानिफनाथ धामणगाव देवी मोहटादेवी दर्शन जाताना हदय विकाराच्या तिव्र झटक्यानेे निधन झाले. पत्नी, एक मुलगा, आई वडील, दोन भाऊ असा त्यांचा परिवार आहे. अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 
त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हार गावात जय हिंद सैनिक फौंडेशन अहमदनगर च्या माध्यमातुन 500 वडांची झाडे व 1000 फळझाडांचे डोंगरी स्मृती उद्यान बनवण्यात आलेे. कोरोना काळात मोठ्या जबाबदारीने फवारणी तसचे औषध वाटपाचे काम केले. माझ गाव, माझ कुटुंब समजुन गावाची आर्दश गावाकडे वाटचाल सुरू करणार्या या योद्धास जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अहमदनगर व कोल्हार ग्रामपंचायतच्या वतिने भावपुर्ण श्रद्धांजली…

Related Articles

Back to top button