गुन्हे वार्ता

विहामांडवा येथील म्हशी चोरणारे पोलिसांच्या जाळ्यात..

 

◾पाचोड पोलिस व स्थानिक गुन्हा शाखेची संयुक्त कारवाई

विजय चिडे/पाचोड : पैठण तालुक्यातील विहामांडवा येथून जनवरांची चोरी करणाऱ्या चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखा व पाचोड पोलिसांना यश आले आहे. सोमवारी (दि.२७) सकाळी पहाटे चारच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली असुन  त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेल्या तीन्ही म्हशी हस्तगत करण्यात आल्या आहे.

अधिक माहिती अशी की, विहामांडवा येथील शेतकरी सय्यद रशिद सय्यद बाबु (वय ५०) वर्षे यांनी गावातील एका व्यक्तिला ठोक्याने शेती दिली आहे. त्यांच्याकडे सहा म्हशी असून ते दररोज सकाळी व सायंकाळी म्हशींना चारा पाणी टाण्यासाठी जात असतात. नेहमीप्रमाणे त्यांनी (दि.२५) रोजी सायंकाळी आपल्या म्हशींना चारा पाण्याची वैरण करून शेतातील एका चिंचेच्या झाडाखाली बांधून ठेवले होते. सय्यद हे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हशींना चारा टाकण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या तीन म्हशी दिसल्या नाहीत. म्हणून त्यांनी आजुबाजुला शोध घेतला असता त्यांना म्हशी कुठेच मिळून आल्या नाहीत. ५० हजार रुपये किमतीची जनावरे चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी सय्यद यांच्या तक्रारीवरून (दि.२६)रोजी पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व पाचोड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या व खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे संतोष यशवंत बुधनर (वय३५वर्ष) परमेशवर सीताराम बुधनर (वय ४५ वर्ष) दोघे रा. खामगाव ता.जि.बीड, रामकीसन उर्फ दादा राजेंद्र (वय २३ ) रा. नांदूर हवेली ता.जि.बीड, गणेश उर्फ दादू आप्पासाहेब कोकरे (वय २० वर्ष) रा. विहामांडवा ता.पैठण अशी मुसक्या आवळलेल्या चोरट्यांची नावे आहे. पोलिसांनी तातडीने त्या चारही जणांना गजाआड केले असून त्यांच्याकडील तीनही म्हशी ताब्यात घेवून पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांनी शेतकरी सय्यद रशिद सय्यद बाबु यांच्या म्हशी परत केल्या. चारही आरोपींना पुढील तपासासाठी पाचोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, आरोपींकडून जनावरे चोरीचे अन्य गुन्हे उघडकीस येतील, अशी शक्यता स्थानिक गुन्हे शाखेसह पाचोड पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिस निरीक्षक खेतमाळस, अंमलदार पोना श्री.भालेराव, पोना श्री.जाधव तसेच पाचोड पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सुशांत सुतळे, सहाय्यक फौजदार सुधाकर मोहिते ,पोना माळी, पोका पवन चव्हाण यांनी संयुक्त रित्या कारवाई केली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button