आरोग्य

लसीकरण मोहीम जोरात पण जनजागृतीची गरज

कोरोना काळात संगमनेर तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाने खुप चांगले काम केले आहे. गावागावात कॅम्प घेऊन लसीकरण मोहीम चालू आहे. मात्र तरी ही आज संगमनेर तालुका जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढित अग्रेसर आहे. प्रशासन त्यांची जबाबदारी पूर्ण पणे चोख पाळत आहे.

नागरिकांनी मास्क चा वापर न करणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, हे प्रकार कमी होत नाहीत. तसेच तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर लसीकरण जनजागृती कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. कारण लसिकरणा संदर्भात आज ही खुप शंका लोकांच्या मनात आहे. ही भीती घालवून लसीकरण घडवून आणणे गरजेचे आहे. त्या साठी सर्व सामाजिक संघटनानी व राजकीय पक्षांनी जनजागृती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे.

कोरोना रुग्ण संख्या जास्त असलेल्या गावात व्यापारी वर्गाने व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. आपली व कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी, कारण वेळ वाईट आहे माणस वाईट नाहीत. १८ वर्षा वरील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. आपल्या मनातील शंका आपल्या जवळच्या खाजगी रुग्णालयात किंवा सरकारी रुग्णालयात जाऊन विचारा व लसीकरण आवश्य करून घ्या.

 इंजि.आशिष कानवडे

(संचालक- आशिष बिल्डकॉंन, संगमनेर)
7028456005

Related Articles

Back to top button