कृषी

राहुरी कृषि विद्यापीठाच्या गणेशखिंड, पुणे येथील रोपवाटिकेला राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाची मान्यता

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या गणेशखिंड, पुणे येथील विभागीय कृषि संशोधन केंद्राच्या रोपवाटिकेस दोन स्टार मान्यताप्राप्त रोपवाटिका म्हणून मान्यता मिळाल्याचे भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत असलेल्या राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाने कळविले आहे.
दि. 17 मे, 2022 रोजी राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाने नियुक्त केलेल्या समितीने विभागीय कृषि संशोधन केंद्राच्या रोपवाटिकेचे नियमानुसार विविध मुद्द्यांच्या आधारे परीक्षण केले. त्यानुसार राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाने नुकतेच पत्र पाठवून सदरच्या रोपवाटिकेस आंबा, पेरू, डाळिंब, लिंबू व सिताफळ या फळ पिकांच्या विविध वाणांची उत्कृष्ट प्रतीची कलमे तयार करणे कामी दोन स्टार मान्यताप्राप्त रोपवाटिका म्हणून मान्यता मिळाल्याचे कळविले आहे.
गणेशखिंड येथील सहयोगी संशोधन संचालक डॉ. विनय सुपे व त्यांच्या चमूचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button