अहमदनगर

इपीएस ९५ पेन्शनर्स आंदोलनात सक्रीय सहभागी राहणार – खा.भाऊसाहेब वाकचौरे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : इपीएस ९५ पेन्शनर्सना दरमहा ७ हजार ५०० रुपये पेन्शन अधिक महागाई भत्ता मिळावा, मोफत वैद्यकीय सुविधा द्यावी आदी प्रश्नांची मला पूर्ण जाणीव असून पूर्वी खासदार असताना व नसताना सतत प्रयत्न केले असून मी स्वत: आपला माणूस आपल्यासाठी राहणार आहे. सर्वांनी पुन्हा खासदार होण्याची मला संधी दिली आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन खासदार वाकचौरे यांनी केले आहे.

पुढे बोलताना खासदार वाकचौरे म्हणाले की, संसदेचे अधिवेशन सुरु झाल्यावर आपल्या संघटनेच्या प्रतिनिधींची केंद्रीय श्रममंत्री व विभागातील अधिकारी यांचे सोबत बैठक करण्याची मी जबाबदारी घेतो. तसेच ३१ जुलैच्या दिल्ली येथील आंदोलनात तुमच्या सोबत सहभागी होणार असल्याची माहिती खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी श्रीरामपूर येथे शनिवारी कॉंग्रेस भवन श्रीरामपूर येथे झालेल्या इपीएस ९५ पेन्शनर्स मेळाव्यात दिला.

प्रास्तविकात पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी खा.वाकचौरे यांच्या कामाचे कौतुक करून राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांच्या नेतृत्वाखाली ३१ जुलैच्या आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली. या मेळाव्यात नवाज शेख, थोरात जामखेड, नेवासा तालुकाध्यक्ष बापूराव बहिरट, विनायक लोळगे, चौधरी, सुलेमान शेख संगमनेर, शिर्डी अध्यक्ष दशरथ पवार, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष राधाकृष्ण धुमाळ आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी श्रीरामपूर, राहाता, राहुरी व नेवासा तालुक्यातील पेन्शनर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button