अहमदनगर

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या युवती आघाडी जिल्हाध्यक्षपदी मनिषाताई पटारे

नगर : स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा समाजाला न्याय देण्यासाठी अराजकीय पध्दतीने एकत्र करत आहे. कुणी कुठल्याही पक्षात रहा फक्त मराठा म्हणून स्वाभिमानी मराठा महासंघात सामील व्हा असे विचार घेऊन वाटचाल सुरु आहे. याच धर्तीवर स्वाभिमानी मराठा महासंघाच्या युवती आघाडी अहिल्यादेवी नगर जिल्हा अध्यक्ष पदी मनिषाताई पटारे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र संघटनेचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले यांनी दिले.

मनिषाताई पटारे निवडी प्रसंगी म्हणाल्या की, मराठा समाजातील गरीब घटकांचा विकास व्हावा, समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक महिलांनी पुढे आले पाहिजे. स्वराज्य उभे करण्यासाठी आईसाहेब जिजाऊंनी कष्ट घेतले. आता मराठा आरक्षण मिळविण्यासाठी आपण कष्ट घेवू.

मनिषाताई पटारे यांच्या निवडीचे स्वागत स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ.कृषिराज टकले, राष्ट्रीय अध्यक्ष मराठा रामनारायण, राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ, राष्ट्रीय सरचिटणीस राजबीर सिंह, राष्ट्रीय चिटणीस सलील सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष दिपक पवार, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा कोकीळा पवार, प्रदेशाध्यक्षा अनिताताई पाटील, कार्याध्यक्षा अमृता पठारे, दक्षता आघाडी प्रदेशाध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे, युवती आघाडी अध्यक्ष ज्योतीताई सातव, युवा आघाडी अध्यक्ष अभिजित खैरे, उपाध्यक्ष रुपेश दळवी, कार्याध्यक्ष लखन घाडगे आदींनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button