धार्मिक

सद्गुरू गंगागिरी महाराज अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेस प्रारंभ

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्री सद्गुरू गंगागिरी महाराज अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचा प्रारंभ श्रीक्षेत्र गोदावरी धाम सरला बेट येथे झालेला असून प्रशस्त भव्य गुरुकुल इमारतीत भव्य भजन हॉल असून गुरुकुल परिसरात सीसीटीव्ही सुविधा आहे. या शिक्षण संस्थेत अनुभवी शिक्षकवृंद आहे.

महंत सद्गुरू रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी यांना शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या शिक्षण संस्थेत इ.५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. संस्थेमध्ये विद्यार्थ्याला कीर्तन, प्रवचन अभ्यास, शास्त्रीय पखवाज, व क्रमाने भजन शिकविण्यात येणार आहे. संस्थेचा पाच वर्षाचा अभ्यासक्रम राहील. संस्थेत इच्छुक विद्यार्थ्यांनी ह.भ.प.गजानन महाराज पवार मो.क्र. ९९२१५१०६४३, ह.भ.प.संतोष महाराज सोळुंके मो. ८८३०४६ ७०७८, अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था संपर्क क्र. ९३७१२३२२१४१, व व्यवस्थापकीय संपर्कासाठी ह.भ.प.मधुकर महाराज विश्वस्त मो.क्र. ९६७३१५०१०० यावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button