कृषी

सिंगापूरच्या टेरा पेसी यांची गोदागिरी फार्म्सच्या मधमाशीपालन विभागास भेट

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील गोदागिरी फार्म्सच्या मधमाशी पालन, गांडूळ खत व नैसर्गिक शेती प्रक्षेत्रास सिंगापूरच्या टेरा पेसी यांनी नुकतीच भेट दिल्याची माहिती फार्म्सचे संचालक प्रा. ऋषिकेश औताडे यांनी दिली.

सिंगापूरमधील क्विंटेट कम्युनिटी येथे गांडूळखत उत्पादन तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या टेरा पेसि ह्या महाराष्ट्राच्या शेती व व्यापार विषयावर अभ्यास दौऱ्यावर आहेत, त्यादरम्यान तालुक्यातील नावीन्यपूर्ण प्रयोगांना भेट देण्यासाठी त्या श्रीरामपूर, राहाता येथे एक दिवसाच्या अभ्यास दौऱ्यावर होत्या.

त्यांनी कोल्हार येथील संजय राऊत संचालित अर्थरीच गांडूळखत प्रकल्प व चिंचपुर येथील कृषिभूषण बन्सी पाटील तांबे संचालित कृषिभूषण ऍग्रोटुरिझम येथे भेट दिली व माहिती घेतली. सिंगापूर मध्ये तेथील जनतेसाठी भारतातील शेती व पूरक उद्योग शाश्वत पर्यावरण टिकवण्यासाठी कसे उपयोगी होऊ शकते त्याबाबत त्यांनी चर्चा केली. या भेटी दरम्यान डॉ. राम काळे, बापूसाहेब जाधव, प्रीतेश सिंघ यांचे विशेष सहकार्य लाभले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button