अहमदनगर

मुळा पाटबंधारे कर्मचारी गुलाब शेख ४२ वर्षांच्या कार्यपूर्ती नंतर सेवानिवृत्त

राहुरी | जावेद शेख : तालुक्यातील वरवंडी येथील रहिवासी गुलाब उस्मान शेख (गुल्लूभाई) हे मुळा पाटबंधारे विभागातील कर्मचारी आपल्या ४२ वर्षांच्या प्रदीर्घ कर्त्तव्यपूर्ती नंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.

सन १९८२ मध्ये सेवेत रुजू झाल्यानंतर नेवासा, सोनई व मुळा धरण येथे त्यांनी सी.आर.टी कर्मचारी म्हणून जबाबदारी चोखपणे पार पाडली. त्यांचे कार्यकाळात त्यांना कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता यांचेसह विविध अधिकारी, सहकारी कर्मचारी यांची मोलाची साथ मिळाल्याची भावना गुलाब शेख यांनी व्यक्त केली. लवकरच त्यांच्या सेवापुर्तीचा सोहळा आयोजित करणार असल्याची माहिती त्यांचे कुटुंबीयांनी दिली आहे. गुलाब शेख यांना भावी आयुष्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button