धार्मिक

वरवंडीत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

राहुरी | जावेद शेख : तालुक्यातील वरवंडी येथे ३१ मे २०२४ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ९ ते ११ आहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी सुभाष गायकवाड, योसेफ भालेराव, पत्रकार आर.आर.जाधव यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याबद्दल मनोगते व्यक्त केली.

सायंकाळी ७ ते ९ विद्युत रोषणाईच्या रथातून फटाक्यांच्या आतीशबाजीत सवाद्य गावातून भव्य मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीत वरवंडीतील ग्रामस्थांनी तसेच मा.उपसरपंच दिलीप थोरात, रामभाऊ शिंगाडे, रामा गर्दे, पोपट माने, विष्णु शिंगाडे आदींच्या समुहांनी जागोजागी गजीनृत्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. हा जयंती उत्सव पार पाडण्यासाठी नितीन बरे, कोंडीराम बाचकर, राधाकृष्ण बरे, संदिप बाचकर व त्यांच्या संयोजक समुहाने अथक परिश्रम घेतले.

या प्रसंगी मोरया समुहाचे गोरख अडसुरे, वरवंडीचे सरपंच भाऊसाहेब कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य बंटी अडसुरे, मा उपसरपंच भास्कर काळे, शरद ढगे, पैलवान दत्तु अडसुरे, राजु बर्डे, दिपक बर्डे, संतोष थोरात, गोरख कदम, गौतम शिंदे, आण्णा गर्दे, रामनाथ कोळेकर, संभाजी गर्दे, अक्षय पवार आदींसह बहुसंख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. या कार्यक्रमात महीलांची उपस्थिती लक्षणीय होती.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button