भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी व स्त्री गर्जना जागृती महासंघाचे पहिले अधिवेशन उत्साहात संपन्न
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी व स्त्री गर्जना जागृती महासंघाचे 1ले अधिवेशन यशस्वीरित्या श्रीरामपूर येथील राधिका हॉटेलच्या सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी साप्ताहिक पुणे प्रवाहाच्या १३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुण गौरव सोहळा संपन्न झाला.
यावेळी काशिनाथ बाबूराव गायकवाड व सौ. मरियाबाई काशिनाथ गायकवाड यांना पुणे प्रवाहरत्न 2024 – आदर्श माता पिता पुरस्कार, 74 वर्षाचे 47 वर्षाचे अनुभवी जेष्ठ पत्रकार बाबासाहेब रामकृष्ण चेडे यांना आदर्श युवा पत्रकार पुरस्कार, ब्राह्मणगावचे सरपंच सौ. मनिषाताई शिंदे यांना आदर्श सरपंच पुरस्कार, ब्राह्मणगावचे उपसरपंच सौ.अरुणाताई पानसरे यांना आदर्श उपसरपंच पुरस्कार, ब्राह्मणगावचे पोलीस पाटील संदिप हरिदास वेताळ पाटील तसेच संतोष भांड यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्कार, स्व.प्रभाकर काशिनाथ सागवेकर यांच्या स्मरणार्थ भानूदास सखाराम गायकवाड व बबनराव जठार यांना आदर्श बाप पुरस्कार, राजेश शेट्टी आणि चेतन शेट्टी यांना आदर्श युवा उद्योजक, पद्माकर रत्नाकर जाधव यांना आदर्श कामगार पुरस्कार, स्व. सुशिलाबाई सागवेकर यांच्या स्मरणार्थ श्रीमती अनुसयाबाई दशरथ कर्दळे, मंदाकिनी सागवेकर व यमुनाबाई प्रभाकर कांबळे यांना आदर्श माता पुरस्कार, भाऊसाहेब शिंदे यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार, श्रीमती बन्साबाई मारुती गायकवाड व सौ.जनाबाई बबनराव जठार यांना आदर्श ताईसाहेब पुरस्कार, असे पुरस्कार देण्यात आले. अशा रितीने भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी व पुणे प्रवाहाचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाल्याचे प्रियाताई कर्दळे यांनी सांगितले.