अहमदनगर

नवीन शैक्षणिक धोरणातील बदल टप्प्याटप्प्याने होणार- अरुण भांगरे

अकोल्यात ७०० माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांना क्षमता वृद्धी प्रशिक्षण

राहुरी | जावेद शेख : नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे लागू झालेले असून या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू होत आहे. त्यानुसार प्रत्येक शिक्षकांनी आपल्यात देखील बदल करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर चे वरिष्ठ अधिव्याख्याता व जिल्हा प्रशिक्षण समन्वयक अरुण भांगरे यांनी केले.

भविष्यात शिक्षकांवर आपल्यातील क्षमता वृद्धिंगत करून देशाचा चांगला नागरिक घडविण्याची जबाबदारी आहे. अकोले तालुक्यातील जवळजवळ ७०० माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना दि. २१ फेब्रुवारी २०२४ ते १३ मार्च २०२४ पर्यंत एकूण पाच टप्प्यात शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे विविध तज्ञ सुलभाकांच्या सहाय्याने प्रशिक्षण दिले गेले. यापुढेही प्रत्येक वर्षी ५० तासांचे प्रशिक्षण सर्व शिक्षकांना अनिवार्य आहे. त्यामुळे यापुढे विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण देणे गरजेचे आहे, नवीन शैक्षणिक धोरणातील वैशिष्ट्ये, बाल वाटिका, प्राथमिक, माध्यमिक स्तर, समग्र स्वरूपातील मूल्यमापन, प्रभावी शैक्षणिक नेतृत्व, कुमारावस्थेतील मुलांना समजून घेताना, भविष्यवेधी शिक्षण, नवोपक्रम, तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण देणे अशा विविध विषयांचे मार्गदर्शन क्षमता वृद्धी प्रशिक्षणात केले.

या अंतिम टप्प्याच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर येथील वरिष्ठ अधिव्याख्याता कैलास सदगीर, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा समन्वयक वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण भांगरे, तालुका प्रशिक्षण समन्वयक पंचायत समितीचे विषय तज्ञ गणेश घोलप, विलास पठाडे, सहाय्यक प्रशिक्षण समन्वय महेश पाडेकर, सुलभक बाबाजी पापळ, सुनील लांघी, विनायक साळवे, मुकुंद सूर्यवंशी, हरिष आंबरे, गणपत धुमाळ, नीता देशमुख, राधाकिसन लांडगे, सुहास भावसार, बळीराम फरगडे, मंगल आरोटे, सुयोग वाकचौरे, भारत जगधनी, प्रशांत जाधव, राजेंद्र भोर, तुकाराम चव्हाण, तज्ञ सुलभक उपस्थित होते. अंतिम टप्प्याचे प्रशिक्षणार्थीचे कुलप्रमुख विवेक कुमार वाकचौरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार उपप्राचार्य दीपक जोंधळे यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button