अहमदनगर

सेवानिवृत्तीनंतरही आढांगळे यांनी शाळेसाठी योगदान द्यावे – बाळासाहेब उंडे

बाळासाहेब आढांगळे यांचा सेवापूर्ती सोहळा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : बाळासाहेब आढांगळे यांचा सेवापूर्ती सोहळा हा एक त्यांच्या जीवनात आनंदाचा क्षण आहे. त्यांनी २५ वर्षे या संस्थेत सेवा दिली त्याची पावती म्हणून सर्व भावना व्यक्त करतात. या संस्थेत पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळे सेवानिवृत्तीनंतरही काही शिक्षक आपली सेवा देत आहेत. आढांगळे यांनी विद्यार्थ्यांना जे ज्ञान दिले त्याचा विद्यार्थ्यांनी उपयोग करावा. देशपातळीवर नावलौकिक मिळवावा. त्यांना ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सोसायटी संस्थेच्या वतीने शुभेच्छा, असे खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मातापूर येथील बाळासाहेब आढांगळे ह्या शिक्षकाच्या सेवापूर्ती सोहळाप्रसंगी हार्दिक निरोप देताना अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब उंडे यांनी प्रतिपादन केले.

यावेळी उपसरपंच गणपत गायके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब कासार, मा.सरपंच भागीनाथ शिरोळे, प्रकाश उंडे, अप्पासाहेब शिरोळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य विजय थोरात यांनी प्रास्तविक करून शाळेच्या वतीने शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षकांच्या वतीने यावेळी बाळासाहेब आढांगळे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी अरविंद थोरात, वाघुले, कवडे आदींसह विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यालयासाठी आपली कामे बाजूला ठेवून शाळेच्या कामाला प्राधान्य दिल्याचे सांगितले. सेवानिवृत्त झाले असले तरी आढांगळे यांनी शाळेसाठी सेवानिवृत्तीनंतर सुद्धा योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

सत्कारमूर्ती आढांगळे यांनी यावेळी गीत सादर केले व म्हणाले गावातील संस्था, ग्रामस्थांचे शाळेसाठी फार मोठे योगदान आहे. त्यांच्याकडून शिक्षकांबद्दल आदराची भावना आहे. शाळा प्राचार्य विजय थोरात व शिक्षक यांच्यामुळे विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागवून प्रगतीपथावर आहे. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर तुपे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती संगीता गायके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोमवंशी, पवार, सौ दुशिंग, पटारे, धनवटे, गायके आदींनी परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button