अहमदनगर

दादासाहेब करपे यांची स्पेशल फोर्स पॅरा कमांडो मध्ये निवड

राहुरी | जावेद शेख : तालुक्यातील टाकळीमिया गावचे भूमिपुत्र दादासाहेब करपे यांची इंडियन आर्मी मधील स्पेशल फोर्स पॅरा कमांडो मध्ये नुकतीच निवड झाली असुन ते आता ट्रेनिंगला रवाना होणार आहेत.

दादासाहेब करपे यांना लहानपणापासूनच देशसेवेची आवड असल्याने त्यांनी भरतीची प्रॅक्टिस गावातच राहुन केली. त्यानंतर कठिण मेहनत करुन २०२० मध्ये इंडियन आर्मीत भरती झाले. त्यानंतर दादासाहेब करपे यांची ट्रेनिंग बेळगाव येथील मराठा इन्फंट्री येथे पुर्ण होऊन ते देशसेवेसाठी इंडियन आर्मीमध्ये रूजू झाले. दोन वर्षानंतर त्यांची घातक कमांडो मध्ये निवड झाली होती. दरम्यान त्यांचा इंडीयन आर्मीमध्ये उत्तम असा परफॉर्म दिल्यानंतर लगेचच इंडियन आर्मीने त्यांना इंडियन आर्मी मधील स्पेशल फोर्स असलेली पॅरा कमांडो मध्ये निवड जाहीर केली असुन ते आता ट्रेनिंगसाठी जाणार आहे.

पॅरा कमांडोची खासियत म्हणजे एक पॅरा कमांडो तयार करण्यासाठी इंडियन आर्मीला खूप मेहनत घ्यावी लागते. एक पॅरा कमांडो शेकडो सैनिकांच्या बरोबरीने तयार झालेला असतो. आर्मीमधील पॅरा कमांडोची विशेष स्पेशल फोर्स असते जी देशात घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना सापडून त्यांना ठार मारून दिवस रात्र इंडियन आर्मीचे पॅरा कमांडो देश रक्षणाचे काम करत असतात. जशी ही पृथ्वी ऊन वारा पाऊस यापासून तयार झालेली आहे तसाच एक पॅरा कमांडो घनदाट जंगलात बर्फात राहुन तयार होत असतो.

संपूर्ण देशभरात पॅरा कमांडोंची संख्या खुप कमी असून पॅरा कमांडो हजारो सैन्यांच्या बरोबरीने युद्धाच्या वेळी लढू शकतात ही यांची खासियत आहे. दरम्यान टाकळीमिया गावचे सुपुत्र दादासाहेब करपे यांची इंडियन आर्मी मधिल स्पेशल फोर्स असलेली पॅरा कमांडो मध्ये निवड झाल्याने टाकळीमिया गावातील नागरिकांकडून त्यांना पुढील देश सेवेसाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button