साहित्य व संस्कृती

‘साहित्यशोध’ घेताना ‘संत साहित्याची ज्योत’ जपावी – गुरुवर्य भास्करगिरी महाराज

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी लिहिलेली पुस्तके समाजाला दिशादर्शक ठरणारी असून त्यांनी ‘साहित्यशोध’ घेताना ‘संत साहित्याची ज्योत जपावी, असा आशीर्वाद देवगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी पुस्तक प्रकाशन प्रसंगी आशीर्वाद देऊन अभिनंदन केले.

श्रीरामपूर येथील इंदिरानगर येथील डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ‘साहित्यशोध’ व ‘संत साहित्याची ज्योत’ या पुस्तक प्रकाशन प्रसंगी महाराज बोलत होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी दोन्ही पुस्तकांची माहिती भास्करगिरी महाराजाना दिली. यावेळी माजी ग्रामविस्तार अधिकारी डि. के.उर्फ दगडू कारभारी उंदरे यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये यांची ओळख करून पुस्तक प्रकाशनाची विनंती केली.

सौ.लताताई यादव, बाबासाहेब यादव, शिवाजीराव अहिरे, सौ. अरुणाताई अहिरे, विशाल काळे, आकाश मैड, राहूल गिरमे, आकाश दानवे आदींसह महाराजांच्या समवेत दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन संपन्न झाले. गुरुवर्य भाकरगिरी महाराजांच्या हस्ते अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना अर्पण केलेल्या डॉ. उपाध्ये लिखित ‘साहित्यचिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्याची आठवण सांगून दांडी पौणिमेच्या शुभप्रसंगी पुस्तकाचे प्रकाशन झाल्याचा आनंद व्यक्त केला. डॉ. उपाध्ये यांनी महाराजांना पुंडलिक गवंडी लिखित ‘पासष्टी’ व इतर पुस्तके देऊन सत्कार केला. डॉ. उपाध्ये यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button