धार्मिक
शिरसगाव येथे श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथे दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजता भव्य कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सोमवार दि.२२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता श्री राम प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या आनंदमय सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन संजय गांधी निराधार योजना तालुकाध्यक्ष गणेशराव मुदगुले, सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच संजय यादव, सर्व ग्रा.प.सदस्य, शिरसगाव ग्रामस्थ व भजनी मंडळ यांनी केले आहे.