अहमदनगर

कचरू महांकाळे यांना राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील महांकाळ वाडगाव येथील माजी सरपंच कचरू महांकाळे यांना नुकताच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे भूमी फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या चतुर्थ वर्धापन दिनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्र.कुलगुरू डॉ पराग काळकर यांच्या हस्ते व अध्यक्ष प्रा.कैलास पवार, उद्योजक फत्तेचंद राका, भारतीय हवाई दल एयर मार्शल प्रदीप बापट, सिल्व्हर ग्रुप संचालक संतोष बारणे, उपसरपंच राहुल दातिर आदींच्या उपस्थितीत राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महांकाळ वाडगाव सारख्या ग्रामीण भागात संस्थेच्या वतीने महिलांना शेळ्या वाटप, पाणी पुरवठा योजनासाठी सहकार्य, नागरिकांना रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजनासाठी मदत करणे आदी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व सरपंच पदावर असताना गावात विविध विकासाची कामे केल्याबद्दल हा गौरव करण्यात आला. त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button