राजकीय

भाजपच्या विजयाचा श्रीरामपूरात पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : भारतीय जनता पक्षाला तीन राज्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा जल्लोष श्रीरामपूर तालुका व शहर भाजपच्या वतीने काल रविवारी साजरा करण्यात आला. तालुकाध्यक्ष दिपक पटारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आनंदोत्सवात कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांचे निकाल काल जाहीर झाले. यामध्ये मतदारांनी तीन राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत दिले. या निकालानंतर देशातील अनेक शहरात भाजपकडून विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे. श्रीरामपूर तालुका व शहर भाजपच्या वतीने जल्लोष करून हा विजय साजरा करण्यात आला. शहरातील मेन रोडवरील महात्मा गांधी चौकात हा उत्सव झाला. ढोल ताशाचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करत मोदी सरकारचा जयघोष या वेळी केला जात होता.

यावेळी भाजपच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना तालुकाध्यक्ष दीपक पटारे म्हणाले की, ज्याप्रमाणे राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश येथील जनतेने भारतीय जनता पार्टी वर विश्वास दाखवत पूर्ण बहुमताने या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी कौल दिला. त्याचप्रमाणे आगामी महाराष्ट्राच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनता विकासाबरोबर आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहून महाराष्ट्रात पूर्ण बहुमतात भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन करेल. त्याचप्रमाणे राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरचा आमदार देखील भाजपचाच होईल असा ठाम विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर, शशिकांत कडूसकर, मंजुश्री ढोकचौळे, गणेश राठी, शहराध्यक्ष मारुती बिंगले आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाजार समितीचे संचालक गिरीधर आसने, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर, तालुका उपाध्यक्ष शंकरराव मुठे, रामभाऊ तरस, दत्ता जाधव, बंडूकुमार शिंदे, अजित बाबेल, रुपेश हरकल, मिलिंदकुमार साळवे, विजय आखाडे, रवी पंडित, साजिद शेख, विशाल अंभोरे, श्रेयश जिरंगे हंसराज बत्रा, महेश सुल, रामभाऊ जगताप, मुनीर भाई शेख, योगेश ओझा, प्रसाद बिल्दिकर, सुबोध शेवतेकर, निलेश गीते, गणेश मुदगुले, रुद्रप्रताप कुलकर्णी, पंकज करमासे, ओम जाधव, पंकज ललवाणी, राजूभाऊ धामणे, अतुल वडने, अक्षय गाडेकर, कृष्णा चव्हाण, सोमनाथ अवसरमोल, संदिप आसने, दीपक अमोलिक, मंजुश्रीताई ढोकचौळे, सरपंच छायाताई बेर्डे, अनिताताई शर्मा, पुष्पाताई हरदास, वैशाली जगताप, वैशाली पवार आदी यावेळी उपस्थित होते.

महसूल मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने श्रीरामपूरकरांचे स्वप्न साकार होणार…!

श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष केले जात होते. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजनमधून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे श्रीरामपूरकरांचे मागील अनेक वर्षांपासून असलेले स्वप्न महसूल मंत्री विखे पाटील यांच्यामुळे साकार होणार आहे.

दीपक पटारे, तालुकाध्यक्ष भाजपा

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button