राजकीय

प्रवरा परिसरातील सरपंचाचा समर्थकांसह आ. तनपुरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

राहुरी | बाळकृष्ण भोसले : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्रवरा परिसरातील धानोरे गावचे सरपंच श्याम बाळासाहेब माळी यांनी आपल्या समर्थकांसह माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सरपंच माळी हे विखे गटातील आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला. आमदार तनपुरे यांच्या विकसनशील कार्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. निर्णय घेत असताना गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेत सर्वांनी एकमुखी पाठिंबा दर्शविल्याने प्रवेश केला असल्याचे सरपंच श्याम माळी यांनी सांगितले.

त्यांच्या समवेत विशाल ब्राह्मणे, सनी पगारे, गणेश मोरे, विशाल पिंपळे, धनंजय मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन दिघे, अमोल दिघे, विजय दिघे, मिलिंद अनाप, सात्रळ ग्रामपंचायत सदस्य सागर डुक्रे, जगदीश दिघे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार ताळागाळापर्यंत पोहोचून जोमाने कार्य करावे, अशी अपेक्षा आमदार तनपुरे यांनी व्यक्त करून प्रवेश करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button