प्रासंगिक

मुख्यमंत्री शिंदे ठरत आहेत रुग्णांसाठी लांबे यांच्या रुपात “देवदूत”

राहुरी – मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामुळे राहुरी तालुक्यातील गंभीर आजारावरील रुग्णांना मदत मिळण्यासाठी मोठी मदत मिळत आहे. राहुरी तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाने शिर्डी लोकसभेचे खा.सदाशिव लोखंडे यांच्या सहकार्याने राहुरी तालुक्यात शिवसेना तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे यांच्या मदतीने आता पर्यंत गंभीर आजारांवर उपचारासाठी अनेक रुग्णांना लाखो रुपयांची मदत मिळालेली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून हृदय प्रत्यारोपण, कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष २ ते ६), हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडणी प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, लहान बालकांचे शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन), नवजात शिशुंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या आजारांवर अर्ज केल्यास मदत मिळत आहे, अशी माहिती वैद्यकीय मदत कक्षाचे जितेंद्र जाधव व डॉ.शबनम इनामदार यांनी दिली.

देवेंद्र लांबे यांनी म्हंटले आहे कि महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्रातील रुग्णांना देवदूत भेटले आहेत. अडचण तिथे मुख्यमंत्री शिंदे हेच समीकरण सर्वत्र पहावयास मिळत आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ना.शिंदे साहेब जनसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कामाचा ओघ पाहता नव्या पिढीतील तरुण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत आहेत.

राहुरी शहरातील येवले आखाडा येथिल पोपट सहादू वामन यांना रु.५० हजार, राहुरी येथिल कृष्णा ज्ञानेश्वर तनपुरे यांना रु.५० हजार, दिपक अशोक वराळे यांना रु.५० हजार मदत शिवसेना राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांच्या प्रयत्नामुळे मिळाली आहे. राहुरी तालुक्यात मुख्यमंत्री वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी काही अडचण भासल्यास गौरव तनपुरे, महेंद्र शेळके, प्रशांत खळेकर, अशोक तनपुरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेना प्रमुख देवेंद्र लांबे यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button