अहमदनगर

आमदार तनपुरेंच्या हस्ते भूमिगत गटारीच्या कामाचा श्री गणेशा

राहुरी | अशोक मंडलिक : महाविकास आघाडीच्या काळात शहरातील भुयारी गटारीचे काम मार्गी लावण्यात आले. आज त्या भूमिगत गटारीच्या ९२ कोटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाचे उद्घाटन आमदार तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

राहुरी शहरातील १३४ कोटी पेक्षा जास्त रक्कमेच्या कामाचाही श्री गणेशा दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता राहुरी कॉलेज परिसरातून करण्यात आला. यावेळी तनपुरे म्हणाले महाविकास आघाडीच्या काळात आपल्या विचारांचे सरकार असल्याने शहरातील भरपूर कामे मार्गी लावण्यात आली. मी या योजनेसाठी गेली दोन-तीन वर्ष प्रयत्न केला, याचा आनंद होत आहे. आता कामे आम्ही मार्गी लावली व दुसरेच श्रेय घेत असल्याचे आमदार तनपुरे यांनी सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार, राजेंद्र जाधव, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, बाळासाहेब उडे, सूर्यकांत भुजाडी, संतोष आघाव, संदीप सोनवणे, महेश उदावंत, नानासाहेब शिंदे, ओंकार कासार, राजेंद्र बोरकर, सुजित वाबळे, दशरथ पोपळघट, किशोर जाधव, विलास तनपुरे, संकेत दुधाडे, गजानन सातभाई, नरेंद्र शिंदे, बाबासाहेब येवले, दीपक तनपुरे, ज्ञानेश्वर जगधने, ऋषिकेश म्हसे, बाळासाहेब खुळे, प्रकाश भुजाडी, सचिन भिंगारदे, दिनेश तनपुरे, गणेश वराळे, योगेश आमटे, सावळेराम तनपुरे, गणेश घाडगे, अशोक कदम आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button