सामाजिक

मधुकर घाडगे समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

राहुरी – उत्तर अहमदनगर प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी दिव्यांग बांधवांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्ली दरबारी दखल घेऊन महाराष्ट्र सदन केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे यांच्या हस्ते बहुजन ग्रामविकास सेवा संघाच्या वतीने राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

माजी राज्यमंत्री दिव्यांग स्वातंत्र्य मंत्रालय अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली 2012 पासून प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष ते जिल्हाध्यक्ष व दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या मूलभूत गरजा, दिव्यांग प्रमाणपत्र, रेल्वे पास, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांगांना स्वतंत्र रेशन कार्ड, अंतोदय कार्ड या योजना मिळण्यासाठी विविध शिबिरांचे आयोजन करून केंद्र व राज्य शासनाच्या ज्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचल्या नाहीत त्या योजनेचा लाभ त्यांनी दिव्यांगांना मिळवून दिला.

आज त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन बहुजन ग्रामविकास सेवा संघाच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच राहुरी तालुक्यातील लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे धनंजय पानसंबळ व मराठा एकीकरण समिती, मराठा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करणारे देवेंद्र लांबे पाटील, दुग्ध व्यवसाय क्षेत्रात विशेष काम करणारे गणेश भांड, आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे ह.भ.प संपत महाराज जाधव यांनाही राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पुरस्कार मिळाल्याबद्दल अशोक तनपुरे, रोहित नालकर, प्रशांत खळेकर, संभाजीराव दहातोंडे, अण्णासाहेब म्हसे, जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे, ह.भ.प नानासाहेब महाराज शिंदे, जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे, सुभाष कोकाटे, उत्तर अहमदनगर जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, राहुरी तालुकाध्यक्ष योगेश लबडे, तालुका महिला अध्यक्षा सौ.छायाताई हारदे, तालुका उपाध्यक्ष तारडे मानिक, तालुका सल्लागार बाबुराव शिंदे, दादासाहेब मोरे, तालुका सचिव दत्तात्रय खेमनर, सुरेश दानवे, बाबासाहेब मुसळे, संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी, भास्कर दरंदले बाळासाहेब गांडळ, भरत आढाव, जुबेर मुसानी राजेंद्र आघाव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button