महाराष्ट्र

भागचंद औताडे यांची संयुक्त महामंडळाच्या प्रदेश संघटकपदी निवड

जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे; पदाधिकारी आग्रही

श्रीरामपूर : अखिल भारतीय राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या प्रमुख प्रदेश संघटक पदी भागचंद औताडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाची बैठक जीवन विकास ग्रंथालय, संभाजीनगर येथे महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.

या बैठकीत जुनी पेन्शन योजना मिळावी या मागणीसाठी मराठवाडा मुख्याध्यापक संघ, विदर्भ मुख्याध्यापक संघ व पश्चिम महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाने आक्रमक भूमिका घेतली व ३१ जुलै पर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत त्रिस्तरीय कमिटीने योग्य जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाजूने निर्णय दिला नाही तर अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ तीनही विभागात भव्य आंदोलन छेडणार असल्याचे लेखी निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त यांना ई-मेलव्दारे पाठविले आहे.

या आंदोलनाचे नियोजन संयुक्त महामंडळ पुढील आठवड्यात पुणे येथे होणाऱ्या बैठकीत करणार आहे. यावेळी सेवा निवृत्त शिक्षकांची जिल्हा परिषदेच्या शाळेवर नेमणूक करण्याच्या शासन निर्णयास तीव्र विरोध करण्यात आला. सेवा निवृत्त शिक्षक घेण्याऐवजी शिक्षक भरती त्वरित करावी. संच मान्यता आधारकार्ड शिवाय सुधारित करावी व मुख्याध्यापकांनी दिलेली माहिती यावर विश्वास ठेवून संच मान्यता करावी. शिक्षकांचे रखडलेले मेडिकल बिले, पुरवणी बिले, रजा रोखीकरण यांना तत्वतः मान्यता द्यावी. या सर्व विषयांवर वादळी चर्चा होऊन मा. शिक्षण आयुक्त यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत हे सर्व मुद्दे चर्चिले जाणार असल्याचे भागचंद औताडे यांनी सांगितले.

भागचंद औताडे यांची प्रदेश संघटक पदी निवड झाल्याबद्दल क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, अरुण थोरात, मच्छिंद्र जगताप, रंगनाथ माने, बाबासाहेब चेडे, संदीप त्रंबके, अजय जनवेजा, सुभाष दरेकर, संदीप ओहोळ, जालिंदर शेडगे, नवनाथ ढगे, संदीप उंडे, शेखर पवार, बाळासाहेब भोर, शाम कदम, सोमनाथ वने आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button