ठळक बातम्या

राहुरी शहरातील ग्रामीण रुग्णालयासंदर्भात आ. तनपुरेंकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित

राहुरी | अशोक मंडलिक : ग्रामीण रुग्णालय शहराबाहेर नेण्याचा शासनाचा विचार असल्याची चर्चा कानावर येत आहे. शहरात ग्रामीण रुग्णालयासाठी नगरपालिकेची जागा उपलब्ध करून देण्याबाबतीतील अडचणी जवळपास सोडवण्यात आल्या आहेत. या चर्चेमुळे माजी राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी ग्रामीण रुग्णालयासाठी इमारत हस्तांतरीत करण्यासंदर्भात विधानसभेत प्रश्न मांडला.

राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा प्रश्न प्रलंबित असताना संभाव्य ग्रामीण रुग्णालयाची इमारत शहराच्या बाहेर हस्तांतरित करण्याबाबत हालचाली सुरू असून त्याची चर्चा सुरू असल्याची लक्षवेधी आमदार तनपुरे यांनी विधानसभेत उपस्थित केली व यावर शासनाच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण मागितले.

आमदार तनपुरे यांच्या प्रश्नावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, राहुरी शहरात ग्रामीण रुग्णालयासाठी जागा असताना शहराबाहेर जागा पाहण्याचा प्रश्न उद्भवत नाही. पर्यायी जागेसाठी पालिकेची संमती असल्यास यावर चर्चा केली जाईल व याबाबत विधानसभा अधिवेशन सुरू असताना संबंधितांची लोकप्रतिनिधींसमवेत बैठक आयोजित केली जाईल, असे उत्तर दिले. राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नाबाबत अनेक चर्चांना उधान आलेले आहे. या प्रश्नावर विधानसभेत चर्चा झाली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button